Pune Crime | एटीएम मशीन उचकटण्याचा प्रयत्न; चोरट्यांना प्रोत्साहन देणार्‍या बँक अधिकार्‍यांसह सुरक्षा एजन्सीवर FIR दाखल

पुणे / पिंपरी : Pune Crime | चोरट्यांनी निगडीतील एक्सेस बँकेचे एटीएम मशीनचे डोअर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अनेकदा सुचना देऊनही सुरक्षा उपाय योजना न केल्याने पोलिसांनी एक्सीस बँकेचे अधिकारी (Axis Bank Officers and Security Agency) आणि सुरक्षा व्यवस्था पाहणार्‍या हिताची एजन्सीवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. एटीएम चोरी प्रकरणात अशा प्रकारने प्रथम बँक अधिकारी व सुरक्षा एजन्सीवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई उद्धव खेडकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. निगडीतील साईनाथनगर येथील शिवकृपा कॉलनी शेजारील रोडवर एक्सीस बँकेचे एटीएम सेंटर आहे. या सेंटरमध्ये शनिवारी पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी एक चोरटा शिरला व त्याने एक्सीस एटीएम मशीनचा (Axis ATM) कॉस्मॅटिक डोअर उचकटून आतील बाजुला असलेला मेन डोअर उचकटण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर निगडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी एटीएम सेंटरवर गार्ड नेमणे, सी सी टीव्ही लावणे, अलार्म लावणे अशा विविध सुरक्षा उपाय योजना करण्यास एक्सीस बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व एटीएम व्यवस्था पाहणारी हिताची कंपनी यांना पोलिसांनी लेखी सुचना पत्र दिले होते. तरीही त्याबाबत त्यांनी उपाय योजना केल्या नाहीत. ही चोरी करण्यासाठी चोरांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. या कारणावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पैसे वाचविण्यासाठी बँका तसेच सुरक्षा एजन्सी (Bank Security Agency) कोणतेही सुरक्षा उपाय योजना करत नाही. त्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. सुरक्षा उपाय न केल्याने चोर्‍या होतात. त्यामुळे टिका मात्र पोलिसांना सहन करावी लागतेच, शिवाय चोरट्यांचा शोध घेत बसावे लागते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) उचललेल्या या पावलाने बँक अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा

Taxpayers | टॅक्सपेयर्सला दिलासा ! इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तक्रार नोंदवण्यासाठी सुरू केली नवी सुविधा, जाणून घ्या

Pune Unlock | पुण्यातील निर्बंध शिथील ! दुकाने, हॉटेल अन् मॉल बाबतचे निर्बंध शिथिल, जाणून घ्या सविस्तर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Attempting to lift an ATM machine; FIR filed against security agency along with bank officials promoting thieves

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update