Pune Crime | अनाधिकृत बांधकामावरील कारवाईला विरोध करुन पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न; पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   Pune Crime | अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आलेल्या शिवीगाळ करुन धमकावून कारवाईला विरोध करताना स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून काडेपेटीने पेटवून आत्महत्या (Attempt To Suicide) करण्याचा प्रयत्न करण्याची (Pune Crime) धक्कादायक घटना आंबेगाव खुर्द (ambegaon khurd) येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) दोघांना अटक केली आहे. कुणाल आनंद साळुंके (वय ३८, रा. साई सावली बंगला, आंबेगाव खुर्द) आणि राम गंगाधर सरोदे (वय २९, रा. आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी हेमंत कोळेकर यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोळेकर हे आपल्या सहकार्‍यांसह आंबेगाव खुर्द येथील जांभुळवाडी रोडवरील आमृतखान परिसरात अनाधिकृत बांधकामावर गुरुवारी दुपारी कारवाई करतील होते. यावेळी कुणाल साळुंके याने जेसीबी ऑपरेटर कांबळे यांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. साळुंके हे त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन आले.” कारवाई थांबवा. एखाद्याचा प्रपंच रस्त्यावर आला तर तुम्हाला सोडणार नाही,” अशी धमकी देऊन कोळेकर यांना धक्काबुक्की केली. बंदोबस्तावरील पोलीस अंमलदार मगदुम यांनी साळुंके याला बाजूला केले असताना त्याने कारवाईत अडथळा आणणे चालूच ठेवले. राम सरोदे हा जेसीबीच्या टपावर चढून आरडाओरडा करुन महानगरपालिका व अधिकारी यांच्या नावाने शिवीगाळ केली. त्याने प्लॅस्टिकच्या बॉटलीमध्ये आणलेले पेट्रोल अंगावर ओतून काडेपेटीने काडी पेटवून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला. हा प्रकार लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने काडी विझवून सरोदे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे व आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

Web Title : Pune Crime | Attempts to set fire to petrol by protesting against unauthorized construction; Incidents at the Bharati Vidyapeeth Police station are of pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sanjay Raut | ‘…तर मोदी सरकार कृषी कायदे पुन्हा आणेल’

Tata Group | टाटाची शानदार कामगिरी ! ‘या’ कंपनीकडून मिळतोय एका वर्षात 180 % परतावा; यात राकेश झुनझुनवालाचीही अधिक गुंतवणूक

Ginger Tea | जर तुम्ही सुद्धा हिवाळ्यात पित असाल आल्याचा चहा तर व्हा सावध, ‘या’ गंभीर आजारांना बळी पडू शकता!