Pune Crime | भावकीच्या वादातून पुतण्याकडून चुलत्यावर कुऱ्हाडीने हल्ला; शिरूर तालुक्यातील घटना

पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शिरूर तालुक्याच्या वरुडे येथे भावकीच्या किरकोळ वादातून चुलत पुतण्याने चुलत्याच्या घरात प्रवेश करुन आपल्या चुलत्याला कुऱ्हाडने घाव घालत दांडक्‍याच्या सहाय्याने मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करत खुनाचा प्रयत्न करून शेतातील साहित्यांची नासाडी करत (Pune Crime) तोडफोड केली.

याप्रकरणी बबन किसन काळे (रा. वरुडे) याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानोबा आनंदा काळे (वय 76) यांनी फिर्याद दिली. ज्ञानोबा काळे हे त्यांच्या शेतातील घरात जेवण करत बसलेले असताना अचानक बबन काळे हा आला आणि हातातील कुऱ्हाडने ज्ञानोबा काळे यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव टाकला.

ज्ञानोबा यांनी तो घाव हुकावला, त्यावेळी बबन याने लगेच लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच घरातून बाहेर ओढत आणून पुन्हा कुऱ्हाड दाखवत मी तुला आज जिवंत सोडणार नाही, आज तुझे काही खरे नाही, तुझे कुऱ्हाडीने तुकडेच करतो, तुला मारूनच टाकतो अशी धमकी दिली. यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये ज्ञानोबा काळे हे जखमी झाले.

हे देखील वाचा

Pune Journalist Arrest | व्यावसायिकाकडे 5 लाखांची खंडणी मागणार्‍या पत्रकार अर्जुन शिरसाठ याला अटक; यापूर्वीही उकळली होती पाच लाखांची खंडणी, फोनवरील संभाषणातून उघड

MLA Ashutosh Kale | शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी NCP चे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती

Pune Honeytrap Case | पुण्यातील भाजी विक्रेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून केली खंडणीची मागणी; तोतया पत्रकारासह टोळी गजाआड, सापडले CBI चे बनावट ओळखपत्र

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Ax attack on cousin by nephew over brother-in-law argument; Incidents in Shirur taluka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update