Pune Crime | सोने तारण न ठेवता अ‍ॅक्सीस बँकेची केली फसवणूक; गहाण सोने सोडवून घेण्यासाठी घेतले कर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फायनान्स कंपनीत सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. त्यांचा व्याजाचा दर अधिक असल्याने ते तारण सोने सोडून आणून तुमच्या बँकेत ठेवतो, असे सांगून कर्ज मंजूर करुन घेऊन सोने तारण न ठेवता अ‍ॅक्सीस बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. (Pune Crime)

याप्रकरणी अ‍ॅक्सीस बँकेच्या वतीने सोमनाथ धर्माण्णा धसाडे (वय ३८, रा. हिंदनगर, कोंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरज विठ्ठल चव्हाण (रा. जांभुळवाडी रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार अ‍ॅक्सीस बँकेच्या आंबेगाव शाखेत ११ मार्च २२ रोजी घडला होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज चव्हाण यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. इंडिया इन्फोलाईन गोल्ड लोन फायनान्स येथे आपले २५९ ग्रॅम सोने तारण आहे. तेथे व्याज दर जास्त असल्याने तेथून घेतलेले ८लाख २८ हजार रुपयांचे कर्ज भरण्यासाठी कर्ज देण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी इन्फोलाईनमध्ये कर्ज भरण्यासाठी तसेच गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी अ‍ॅक्सीस बँकेने त्यांना ८ लाख २८ हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. मात्र, त्यांनी त्या बदल्यात बँकेत कोणतेही सोने तारण न ठेवता फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कर्चे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Axis Bank fraud without gold collateral; Loans taken to repay mortgaged gold

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त