Pune Crime | बी. जे. मेडिकल कॉलेजला 25 लाखांचा गंडा घालण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजचा (b j medical college pune) बनावट धनादेश प्राप्त करुन त्यावर २५ लाख रुपयांची रक्कम लिहून त्याद्वारे गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

बंडगार्डन पोलिसांनी (Bundgardan Police Station) याप्रकरणी विश्वास पांडुरंग पाटील (Vishwas Pandurang Patil) व त्याच्या सहकार्‍यांवर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. याप्रकरणी बी जे मेडिकल कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी सुरेश बोनवळे (वय ५०, रा. येरवडा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (२५१/२१) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी जे मेडिकल कॉलेजचे बँक ऑफ बडोदामध्ये (bank of baroda) खाते आहे.
त्या खात्याचा बनावट धनादेश प्राप्त करुन त्यावर खोटी सही करुन त्यावर २५ लाख रुपयांची रक्कम टाकून तो बँकेत भरला.
त्यांच्या खात्यातून २५ लाख रुपये काढून घेतले. ही बाब लक्षात आल्यावर बँकेने हे पैसे पुन्हा खात्यात वळते करुन घेतले.
याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची फसवणूक करण्यात आली असल्याने गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | B. J. Attempt to embezzle Rs 25 lakh from medical college

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Facebook सोशल मीडियाच्या जगतातील ‘राक्षस’! जगात प्रत्येक तिसरा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर ‘अ‍ॅक्टिव्ह’, दर तासाला होते 100 कोटीचे ‘इन्कम’

Earn Money | 1 लाख गुंतवून दरमहा करा 8 लाख रुपयांपर्यंत ‘कमाई’, जाणून घ्या काय आहे व्यवसाय आणि कशी करावी सुरूवात?

झोपण्याच्या ‘या’ 8 पद्धती उघड करतात निसर्गाचे गुढ रहस्य, जाणून घ्या काय सांगते तुमची Sleeping Position