Pune Crime | दुर्देवी ! पुण्यातील धायरीजवळ टँकर-दुचाकीचा भीषण अपघात; वृषाली तांबेंचा जागीच मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सिंहगडरोड येथील धायरी (Pune News) येथे टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना (Pune Crime) समोर आली आहे. या दुर्घटनेत दुचाकी चालक महिलेचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. ही घटना आज (गुरूवारी) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. वृषाली विश्वनाथ तांबे (Vrushali Vishwanath Tambe) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

याबाबत माहिती अशी, मृत वृषाली तांबे या धायरीतील रायकर मळा (raikar mala dhayari) इथं लक्ष्मीनारायण सोसायटीत वास्तव्यास आहेत. सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच वृषाली या मुक्ताई गार्डन परिसरातून दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Pune Crime)

दरम्यान, वृषाली तांबे या कर्वेनगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातानंतर सिंहगड पोलिस (Sinhagad Police Station) घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Bad luck! Tanker-two-wheeler accident near Dhayari in Pune; Vrushali Vishwanath Tambe dies on the spot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी