Pune Crime | कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील 64 वर्षाच्या आरोपीला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पतिपासून वेगळे राहणाऱ्या 42 वर्षाच्या महिलेवर बलात्कार (Rape In Pune) केल्याच्या आरोपातील एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी एम. देशपांडे (Additional Sessions Judge Madhuri M. Deshpande) यांनी जामीन मंजूर केला (Bail Granted) आहे, अशी माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. सिद्धांत मालेगांवकर (Adv. Siddhant Malegaonkar) यांनी दिली. याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) गुन्हा (FIR) दाखल असून 64 वर्षाच्या आरोपीसह इतर दोघांनी बलात्कार केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

 

विजय शंकर पुरोहित Vijay Shankar Purohit (वय – 64) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर भरत जेठामल गांधी Bharat Jethamal Gandhi (वय 53, रा. एकबोटे कॉलनी – Ekbote Colony) आणि दिलीप पुष्कराज ओसवाल Dilip Pushkaraj Oswal (वय 53, रा. शुक्रवार पेठ – Shukrawar Peth) यांना यापूर्वी जामीन मिळाला आहे.

 

काय आहे प्रकरण ?
पीडित महिला ही तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिकसंबंध ठेवले. याची माहिती इतर दोन आरोपींना समजल्यावर त्यांनी देखील पीडित महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने तिघांविरुद्ध फिर्याद दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक (Arrest) केली. (Pune Crime)

आरोपीने न्यायालयात जामिनासाठी अ‍ॅड. सिद्धांत मालेगांवकर यांच्यामार्फत अर्ज केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीच्यावेळी (Hearing) सरकारी वकिलांनी (Government Prosecutors) आरोपीच्या जामीनाला विरोध केला. आरोपीने इतर दोन आरोपींना घटनेचे व्हिडीओ आणि फोटो पाठवले असून हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आरोपीला जामीन मिळाल्यास ते पीडित महिलेवर दबाव टाकू शकतात तसेच आरोपी हा राजस्थान (Rajasthan) येथील बिकानेरचा (Bikaner) असून तो पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामीन मंजूर करु नये असा युक्तिवाद (Argument) सरकारी वकिलांनी केला.

 

आरोपीचे वकिल अ‍ॅड. सिद्धांत मालेगांवकर यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, आरोपी 64 वर्षांचे वयोवृद्ध गृहस्थ आहे.
तसेच इतर दोन आरोपींना जामीन मिळालेला आहे.
आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी केस नाही, आरोपीकडून कोणत्याही प्रकारची जप्ती करायची राहिलेली नाही.
तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व अटी व शर्तींचे पालन केली जाईल तसेच साक्षीदाराला अडथळा किंवा संपर्क करणार नाही.
या गुन्ह्यात त्यांना खोट्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे.
असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला.
अ‍ॅड. सिद्धांत मालेगांवकर यांना कामकाजामध्ये अ‍ॅड. प्रमोद धुळे (Adv. Pramod Dhule), अ‍ॅड. मझहर मुजावर (Adv. Mazhar Mujawar), अ‍ॅड. निकीता गर्ग (Adv. Nikita Garg) यांनी मदत केली.

 

Web Title :- Pune Crime | Bail granted to 64 year old Vijay Shankar Purohit in rape case filed at Koregaon Park Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


Ashish Shelar | ‘उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, नवाब मलिकांना…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

 

Weight Gain | ‘या’ 3 योगासनांद्वारे महिनाभरात वाढवू शकता वजन, जाणून घ्या

 

Kareena Kapoor Khan Viral Photo | कॅमेरासमोरच करिना कपूरनं ओपन केला ‘टॉप’, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का