Pune Crime | सेंट्रल बिल्डिंग परिसरातील दरोडा प्रकरणी आरोपींला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे येथील सेंट्रल बिल्डिंग (Central Building) परिसरात दरोड्याच्या (Robbery) तयारी प्रकरणी सराईत आरोपी दिप्या उर्फ दीपक रमेश कांबळे (Deepya alias Deepak Ramesh Kamble) याला शिवाजीनगर जिल्हा न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली (District Judge A. I. Perampally) यांनी जामीन (Bail) मंजूर केला आहे. सदर जामीन अर्जाचे काम अ‍ॅड. राकेश सोनार (Adv. Rakesh Sonar) यांनी (Pune Crime) पाहिले.

 

पुणे येथील सेंट्रल बिल्डिंग परिसरात 28 जून 2022 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास काही अज्ञात इसम हे मिरची पावडर, कटर, लोखंडी रॉड व इतर धारदार शस्त्र बाळगून दरोड्याची तयारी करत असताना व पुणे स्टेशन (Pune Station) कडून कॅम्पकडे येणारे जाणारे पादचारी लोकांना अंधाराचा फायदा घेऊन शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याकरता तयारी करत असलेले चार आरोपींना क्राईम ब्रँच युनिट दोन (Crime Branch Unit Two) यांनी कारवाई करून आरोपींना अटक केली (Pune Crime) होती.

 

त्यातील सराईत आरोपी दिप्या उर्फ दीपक रमेश कांबळे हा मिरची पावडर व लोखंडी रॉड घेऊन अंधारात पहारा देत बसला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, एका महिन्यानंतर 14 जुलै 2022 रोजी क्राईम ब्रँच युनिट दोन यांनी शहरात गस्त घालत असताना आरोपी दिप्या उर्फ दीपक रमेश कांबळे सापडून आला व त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते.

आरोपीच्या वतीने न्यायालयासमोर बाजू मांडताना राकेश सोनार यांनी न्यायालयाच्या असे
निदर्शनास आणून दिले की, सदरच्या गुन्ह्यांत आरोपी हा सराईत या कारणावरून अटक केला आहे,
आरोपी असा कोणताही प्रकारचा गुन्हा (Crime) केला नाही.
हा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी दीपक उर्फ दिप्या रमेश कांबळे यास 30 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
जामीन अर्ज प्रकरणी अ‍ॅड.राकेश सोनार यांना अ‍ॅड. महेश देशमुख (Adv. Mahesh Deshmukh),
अ‍ॅड. सुदर्शन खाडे (Adv. Sudarshan Khade) व अ‍ॅड. वैभवी वंडकर (Adv. Vaibhavi Vandkar) यांनी सहकार्य केले.

 

Web Title :- Pune Crime | Bail granted to accused in case of robbery in Central Building area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा