Pune Crime | लेटरपॅड, शिक्के व सरपंचाची बनावट सही करुन ग्रामपंचायतची फसवणूक प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

दौंड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा. ग्रामपंचायतच्या (Pargaon S.M. of Gram Panchayat) हद्दीतील संवेदनशील प्रकरणातील (Sensitive Case) 11 आरोपींना बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर (Bail Granted) केल्याची माहिती अ‍ॅड. मिथुन चव्हाण (Adv. Mithun Chavan) यांनी दिली. आरोपींवर ग्रामपंचायतची फसवणूक (Fraud) केल्या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात (Yawat Police Station) 10 नोव्हेंबर 2022 रोजी आयपीसी 420, 465, 466, 467, 468, 471, 34 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला होता.

याबाबत पारगाव सा.मा.येथील सरपंच जयश्री शरद ताकवणे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी राहू शहाबुद्दीन शेख, अजिज मुन्सीभाई शेख, कमरुद्दीन रमजानभाई शेख, महम्मद लालाभाई शेख, दस्तगीरभाई मिलुभाई पठाण, शहाबुद्दीन पापाभाई शेख, सोहेल बादशहा पठाण, बादशहा सिकंदर पठाण, अजिज समशेरभाई शेख, समीर शहाबुद्दीन शेख, सना फकिरभाई पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार (Police Inspector Narayan Pawar) करीत आहेत.

काय आहे प्रकरण?

शादवाल पीरबाबाचे देवस्थान हे संवेदनशील जागेत असून पोलिसांच्या निगराणीमध्ये आहे. आरोपींनी ग्रामपंचायतचे लेटरपँड, शिक्का आणि सरपंच यांची बनावट सही करून गावच्या हद्दीतील पिर देवस्थानची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद (Maharashtra State Waqf Board Aurangabad) यांच्याकडे नोंद करण्यासाठी संगनमत करुन फसवणूक केली. प्रकरणी अकरा जणांवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पारगाव व दौंड शहरातमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वक्फ बोर्ड, औरंगाबात यांनी तहसिलदार यांना नोटीस पत्र पाठवून दर्ग्याचे नुतनीकरण करुन वातावरण शांत ठेवण्याचे निवदन दिले होते.

गुन्ह्यातील 9 आरोपींनी अ‍ॅड. मिथुन चव्हाण यांच्यामार्फत बारामती जिल्हा व सत्र न्यायालयात
(Baramati District and Sessions Court) जामिनासाठी अर्ज केला होता.
यावर युक्तिवाद करताना जमिनीची कागदपत्र सादर करुन आरोपींची सत्य बाजू न्यायालयासमोर मांडली.
न्यायलयाने अ‍ॅड. चव्हाण यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपींना जामीन मंजूर केला.

या प्रकरणातील 11 पैकी 9 आरोपींना बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व (Pre-Arrest) तर
एका आरोपीला नियमित जामीन मंजूर केला आहे. तर उर्वरीत एकाला मुंबई उच्च न्यायालयाने
(Bombay High Court) जामीन मंजूर केल्याची माहिती अ‍ॅड. मिथून चव्हाण यांनी दिली.
या प्रकरणात अ‍ॅड. मिथुन चव्हाण यांना अ‍ॅड. प्रशांत पवार (Adv. Prashant Pawar), अ‍ॅड. प्रतिक पवार
(Adv. Pratik Pawar) यांनी सहकार्य केले.

Web Title :- Pune Crime | Bail granted to accused in Gram Panchayat fraud case by forging letterpad, stamp and Sarpanch signature

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nawab Malik | आमदार नवाब मलिक यांचा मुलगा अडचणीत! पत्नीच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, तीन आठवड्यांनी सुनावणी

MP Udayanaraje Bhosale | छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर?, खासदार उदयनराजे भोसलेंनी मांडली भूमिका