Pune Crime | थेऊर येथील तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टेम्पो चालक आणि दुचाकीस्वारामध्ये झालेल्या किरकोळ अपघातातून झालेल्या वादातून टेम्पो चालकाने तरुणाला छातीत लाथा (kicked chest) घातल्या. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) घडली होती. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) थेऊर येथे घडली होती. यामध्ये सुंदर शिवा पवार Sundar Shiva Pawar (वय-24 रा. आलिफनगर) याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपीला सत्र न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर (Sessions Judge B.P. Kshirsagar) यांनी जामीन मंजूर केला आहे.

 

या गुन्ह्यातील आरोपी आदित्य सुधीर धाराशिवकर Aditya Sudhir Dharashivkar (वय-23 रा. कामधेनु इस्टेट, मंत्री मार्केट समोर, हडपसर) हा चालवित असलेल्या चार चाकी वाहनाचा कट लागल्याचे कारणावरून सुंदर पवार व त्याचे इतर साथीदारांचे आदित्य सोबत भांडण झाले होते. त्या भांडणात आरोपीने मयत सुंदर शिवा पवार याच्या छातीत लाथा मारल्याने तो जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला. त्यानंतर त्याला दवाखान्यात मयत घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor police) आदित्य धाराशिवकर याच्यावर भादवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा (Pune Crime) दाखल करुन अटक केली.

या प्रकरणामध्ये आरोपीने ॲड. अभिजित सोलनकर (Adv. Abhijit Solankar), ॲड. हितेश सोनार (Adv. Hitesh Sonar), विष्णू होगे (Vishnu Hoge) यांच्या मार्फेत सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज (Bail application) केला होता. सुनावणीच्या वेळी युक्तीवाद करताना आरोपींच्या वकिलांनी सांगितले की, सदरचा प्रकार हा आकस्मित भांडणातून घडलेला असून आरोपीस मयत यास मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता. तसेच त्यांचे पूर्व वैमनस्य नव्हते व या गुन्ह्यात कोणतेही घातक हत्यार वापरलेले नसल्याने सदरचा प्रकार हा खुनाच्या परिभाषेत मोडत नाही, अशी बाजू आरोपी तर्फे ॲड. अभिजित सोलनकर यांनी मांडली. सत्र न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर (Sessions Judge B.P. Kshirsagar) यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करत प्रथमदर्शनी खुनाचा गुन्हा निष्पन्न होत नसल्याचे मत दर्शवून आरोपीस 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Bail granted to accused in Theur murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 93 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Modi Government | सरकारी बँकेत अकाऊंट आहे? मग ‘या’ योजनेचा घ्या लाभ; दरमहा 28 रुपये जमा करून 4 लाख मिळणार, जाणून घ्या

Koregaon Bhima Violence Case | IPS अधिकारी परामबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे आदेश