Pune Crime | मुलुंड येथील बनावट कॉल सेंटरद्वारे महिलेची फसवणूक करण्याऱ्या आरोपीस जामीन मंजूर

पुणे – Pune Crime | पन्नास लाख रुपयांची लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी काढल्यानंतर पन्नास लाखाचे शुन्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा दत्तवडी पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणात पोलिसांनी ठाणे येथील दानेश रविंद्र बिद्र (वय 24) आणि रोहित संतोष पांडे (वय 25) या दोघांना अटक केली होती. दरम्यान या दोघांना न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. दोघांनी अ‍ॅड. राकेश सोनार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. याबाबत सहकारनगर येथील 42 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. महिल आणि तिच्या पतीची अशा प्रकारे तब्बल अडीच लाख रुपयांची फसवणूक केली होती. सप्टेंबर ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत हा प्रकार घडला होता. (Pune Crime)

पोलिसांनी मुलुंड येथे कारवाई करत या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. अनोळखी व्यक्तीने फोन करून कर्जाच्या अमिषाने महिलेकडून अडीच लाख रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला. (Pune Crime)

सदर आरोपी हे सदर कॉल सेंटरमध्ये नोकरीस होते, सदर घटनेस वरील आरोपीचा काहीही संबंध नाही,
तसेच फसवणूक झालेले रक्कम सदर कोणत्याही आरोपी कडून पोलिसांनी जप्त केली नाही,
दोघांना खोट्या गुन्ह्यात अडकाविल्याचा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. राकेश सोनार यांनी केला,
अ‍ॅड. राकेश सोनार यांना अ‍ॅड. प्रशांत कांबळे, अ‍ॅड. प्रमोद राठोड, अ‍ॅड. विक्रांत सोनवणे यांनी सहकार्य केले.

Web Title :-  Pune Crime | Bail granted to accused of defrauding woman through fake call center in Mulund

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | अजित पवार मोबाईल बंद ठेवून ८-८ दिवस गायब होतात; अजित पवारांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचे पलटवार…

Devendra Fadnavis | ‘हा पहिलाच विरोधी पक्ष आहे, जो स्वत:च्या काळातले घोटाळे बाहेर काढत आहे’, देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला (व्हिडिओ)