Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यातील उच्चशिशित आरोपीला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका उच्चशिक्षीत तरुणावर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात अटक (Pune Crime) करण्यात आलेल्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याची माहिती अ‍ॅड. प्रसाद निकम यांनी दिली.

पीडित तरुणी आणि आरोपी हे नात्यातील असून, आरोपीने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलीने केली होती. तसेच आरोपीने लैगिक संबंधाच्या वेळी व्हिडिओ चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले होते. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर आयपीसी 376, 376 (2) (फ), 376 (2) (N), 377, 323, 506 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. आरोपी मागील एक महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत होता. (Pune Crime)

आरोपीने अ‍ॅड. प्रसाद निकम यांच्यामार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयाला सांगितले की, तक्रारदार मुलगी ही आरोपीपेक्षा वयाने मोठी आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तसेच ती तिच्या मर्जीने आरोपीकडे गेली होती. ही तक्रार गैरसमजुतीमधून करण्यात आली आहे. तक्रारदार तरुणीने एक वर्षानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच आरोपी हा उच्चशिक्षित असून तो यूपीएससीच्या मेन्सपर्यंत पोहोचला आहे. त्याला जेलमध्ये ठेवले तर त्याचे भविष्य धोक्यात येईल. आरोपी पीडित मुलीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयाला सांगितले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी अ‍ॅड. प्रसाद निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला 15
हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. प्रसाद निकम, अ‍ॅड. तन्मय देव,
अ‍ॅड. मन्सूर तांबोळी यांनी काम पाहिले.

Web Title :- Pune Crime | Bail granted to highly educated accused in rape case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime | चुलतीवर बलात्कारप्रकरणी पुतण्याला 10 वर्षांची सक्तमजुरी, कोल्हापूरमधील घटना

Sanjay Raut | गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात; ‘मग त्या राज्यपाल आणि मंत्र्यांना द्या’ – संजय राऊत