Pune Crime | ‘त्या’ प्रकरणात हाऊसकिपींग सुपरवायझरला जामीन मंजूर

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | हाऊसकीपींगच्या (Housekeeping) कामाचे ट्रेनिंग देताना एका 21 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad police station) हद्दीत घडली होती. याप्रकरणी हाऊसकीपींग सुपरवायझर मंगेश आंबेकर (Supervisor Mangesh Ambekar) याच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मंगेश आंबेकर याला न्यायालयाने जामीन (Bail) दिल्याची माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam) यांनी दिली (Pune Crime) आहे.

मंगेश आंबेकर याने अ‍ॅड. प्रसाद निकम आणि अ‍ॅड. तन्मय देव (Adv. Tanmay Dev) यांच्या मार्फत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून निमसे न्यायालयाने आरोपीचा 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच तपास कामात सहकार्य करण्यास सांगून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने जामीन मंजूर (Bail granted) करताना दिले आहेत. याशिवाय फिर्यादीवर कोणताही दबाव न टाकण्यास सांगितले आहे.

 

काय आहे प्रकरण ?

आरोपी मंगेश आंबेकर हा वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कंपनी हाऊसकीपींग सुपरवायझर म्हणून काम करतो.
तर फिर्यादी तरुणी ही नुकतीच या कंपनीत कामाला लागली आहे.
मंगेश याने फिर्यादी तरुणीला ट्रेनिंग (Training) देण्याच्या बहाण्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तरुणीचा विनयभंग केला.
याप्रकरणी तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तरुणीच्या फिर्यादीवरुन वाकड पोलिसांनी मंगेश आंबेकर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

Web Title : Pune Crime | Bail granted to housekeeping supervisor in molestation case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update