Pune Crime | सराईत गुन्हेगार ओंकार बनसोडेला जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) वडारवाडी येथील हेल्थ कॅम्प परिसरात दहशत पसरवत असताना एकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याची घटना घडली होती. ही घटना जुलै महिन्यात वडारवाडी येथील हेल्थ कॅम्प परिसरात घडली होती. या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार ओंकार बनसोडे (Omkar Bansode) याला शिवाजीनगर सत्र न्यायालयाने (Shivajinagar Sessions Court) जामीन मंजूर केला (Bail granted) आहे. सत्र न्यायाधीश राजे कोर्टाने बनसोडे याचा जामीन मंजूर केला आहे.

 

आरोपी ओंकार बनसोडे आणि त्याच्या साथिदारांनी जुलै महिन्यात वडारवाडी येथील हेल्थ कॅम्प (Vadarwadi Health Camp) परिसरात हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आरोपींनी एकावर कोयत्याने वार केले होते. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन बनसोडे याला अटक करण्यात आली होती.

 

ओंकार बनसोडे याने अॅड.ईश्वर चव्हाण (Adv. Ishwar Chavan) आणि अॅड. कमलेश गावडे (Adv. Kamlesh Gawde) यांच्या मार्फत शिवाजीनगर सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायधीश राजे कोर्टाने ओंकार बनसोडे याला 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Bail granted to Omkar Bansode

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा