Pune Crime | प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या बाथरूम-बेडरूममध्ये स्पाय कॅमेरा लावणार्‍या एमडी डॉक्टर सुजित जगतापला जामिन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime | प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या बाथरूम आणि बेडरूममध्ये (Pune Crime) स्पाय कॅमेरा (spy camera) लावणार्‍या एमडी डॉक्टरला ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. सुजित आबाजीराव जगताप (Dr Sujit Abajirao Jagtap) असे या डॉक्टरचे नाव आहे.

जगताप विरोधात डॉक्टरविरुद्ध आयटी अ‍ॅक्टसह विविध कलमांनुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (bharti vidyapeeth police station) करण्यात आला आहे. जगताप हा मेंदूविकारतज्ञ आहे. एका कॉलेजमध्ये तो लेक्चरर आहे. त्यातून त्याची महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांशी चांगली ओळख झाली. त्याने त्यांच्याशी बोलताना नकळतपणे त्यांच्या खोलीच्या चावीचे ठसे घेतले. त्याने त्यांच्या खोलीची बनावट चावी तयार करून घेतली. महिला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये मग्न असल्याचे पाहून त्याने बनावट चावीद्वारे खोली उघडून त्यांच्या बाथरूम आणि बेडरूममध्ये कॅमेरा असलेले बल्ब लावले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

आरोपीला जर जामिनावर सोडले तर तो तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. तसेच एका हॉस्पिटलमध्ये काम करीत असल्याने तो तक्रारदाराला धमकावण्याची शक्यता आहे. त्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा तो गैरफायदा देखील घेऊ शकतो. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. मात्र, आरोपीच्या वकिलांनी सांगितले की, ज्या कलमान्वये आरोपींवर दोषारोप आहे तो गुन्हा जामीनपात्र आहे.

गूणदोषानुसार खटल्याच्या निकालात बराच कालावधी लागणे शक्य आहे. आरोपीला जामिनीवर न सोडल्यास त्याच्या व्यवसायावर विपरीत परिमाण होईल. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपीच्या बाजूने ॲड. सुधीर शाह (Adv. Sudhir Shah), ॲड. सारथी पानसरे (Adv. Sarathi Pansare), ॲड. तेजलक्ष्मी धोपोकर (Adv. Tejalakshmi Dhopokar) आणि ॲड. सूरज इंगळे (Adv. Suraj Ingle) यांनी काम पाहिले.

हे देखील वाचा

Anil Parab | ED चा धोका मला नाही, आतापर्यंत चौकशी नाही, होणारही नाही

Pune Crime | फरार असताना रवींद्र बऱ्हाटेने वापरलेली वाहने व मोबाईल पोलिसांकडून जप्त; पोलिस कोठडीत वाढ, बऱ्हाटेला आश्रय देणारा फरार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Bail granted to Sujit Jagtap, MD, for installing spy camera in trainee doctor’s bathroom

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update