Pune Crime | आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अनैतिक संबंध ठेवून शारीरिक आणि मनसिक छळ करून पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला जामीन मंजूर झाला आहे. अनैतिक संबंध हे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कारण आणि गुन्हा असू शकत नाही, असा बचाव पक्षाचे अ‍ॅड. राकेश सोनार केलेल्या युक्तीवाद (Pune Crime) ग्राह्य धरत सत्र न्यायाधीश एस.बी.शिरसाळकर यांनी हा आदेश दिला.

 

अजिंक्‍य शिवाजी घुले (वय 20, रा. टाकळी, ता. केज. जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. त्याने अ‍ॅड. राकेश सोनार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. आत्महत्या केलेल्या 24 वर्षीय व्यक्तीच्या बहिणीने हिंजवडी पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. जुलै ते 17 सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. अजिंक्‍यचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्याचा जाब विचारल्याने त्याने मयताला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो पत्नीला घेऊन पुण्यात आला. येथे येऊन त्याने मयताच्या पत्नीशी शरीर संबंध ठेवले. त्यानंतर दोघात वाद झाला. यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. Pune Crime)

आरोपी व सदर मयत इसम याची पत्नी यांच्यात कोणताही प्रकारचं अनैतिक संबंध नव्हता, व सदर आरोपी हा त्या मयत पत्नी ला भेटण्यास कधीच पुणेला आला नाही,
पूर्वग्रह दूषित विचाराने फिर्यादी अनिता घुले यांनी आरोपी विरुध्द खोटा गुन्हा दाखल केला आहे
व अनैतिक संबंध हे आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नाही अशी युक्तीवाद आरोपीच्या वतीने अ‍ॅड. राकेश सोनार यांनी केला,
हा युक्तिवाद मान्य करत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.शिरसाळकर साहेब यांनी
आरोपी अजिंक्‍य घुले यास 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
अ‍ॅड. राकेश सोनार याना अ‍ॅड. महेश देशमुख अ‍ॅड. चेतन शिरोडे अ‍ॅड. सुधाकर अंबड यांनी सहकार्य केले.

 

Web Title :- Pune Crime | Bail granted to the accused in the crime of abetment to suicide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मारणे गँगची भिती दाखवून बिल्डरकडे खंडणीची मागणी, सराईत गुन्हेगार राकेश मारणेवर FIR

Jitendra Awhad On Ramdev Baba | ‘रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलीय’ – जितेंद्र आव्हाड

Washim ACB Trap | शिवभोजन थाळीची थकीत रक्कम मिळण्यासाठी मागितली लाच; पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात