Advt.

Pune Crime | पुण्याच्या बालेवाडीत स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी; तब्बल पावणे दोन तासांनी अग्निशमन दलाला कळविली माहिती

पुणे : Pune Crime | बालेवाडी येथील पाटीलनगरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळण्याची दुर्घटना (Balewadi Slab Collapses) घडली. या घटनेत 7 कामगार जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री पावणेदहा वाजता (Pune Crime) घडली. मात्र, या घटनेची माहिती संबंधितांनी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी अग्निशमन दलाला कळविली.

बालेवाडी येथील पाटीलनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरु होते.
इमारतीला लागून पोडियम पार्किंगचे स्लॅब टाकण्यासाठी सांगाडा रचण्यात आला होता.
शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा स्लॅब टाकण्याचे काम सुरु झाले.
या ठिकाणी १८ कामगार काम करीत होते. रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास काम सुरु असतानाच हा संपूर्ण स्लॅब कोसळला. त्याखाली ७ कामगार अडकले होते.
त्यांना तेथीलच लोकांनी बाहेर काढून वाकड येथील लाईफ लाईन हॉस्पिटलला (Life Line Hospital) नेण्यात आले.
सुदैवाने हे कामगार किरकोळ जखमी आहेत.

अग्निशमन दलाला या घटनेची खबर रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी मिळाली.
ही माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी (Pune Crime) दाखल झाल्या. मात्र, त्यापूर्वी सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले होते. ही घटना बाहेर पडू नये, यासाठीच अग्निशमन दलाला कळविण्यात आले नसल्याचे समजते.

हे देखील वाचा

सावधान ! जर तुम्ही सुद्धा विकत असाल Old Coin किंवा Note तर जाणून घ्या ‘ही’ मोठी बाब, RBI ने जारी केली महत्वाची सूचना

Atal Pension Yojana मध्ये ऑनलाइन उघडू शकता खाते, PFRDA ने सुरू केली नवी सर्व्हिस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | balewadi slab collapses in patil nagar 7 worker are injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update