Pune Crime | कामाला येत नसल्याच्या रागातून महिलेचे अश्लील फोटो व्हायरल; पती-पत्नीवर FIR

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बारामती शहरातील (Baramati News) एक धक्कादायक प्रकार समोर आला (Pune Crime) आहे. आपल्याकडे कामाला येत नसल्याच्या रागातून एका दाम्पत्याने महिलेचे अश्लील फोटो (Pornographic Photos) तिच्या पतीसह नातेवाईकांना पाठवल्याची घटना घडली आहे. संबंधीत महिलेची बदनामी केल्याप्रकरणी पती-पत्नीविरोधात शहर पोलिस ठाण्यात (Baramati City Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. देवीलाल पेमाराम कुमावत (Devilal Pemaram Kumawat) आणि पायल देविलाल कुमावत (Payal Devilal Kumawat) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

याबाबत माहिती अशी की, जून 2021 पासून ती व तिचा पती देवीलाल यांच्याकडे बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. तिचा पती फरशी बसविण्याचे काम करत होता. दरम्यानच्या काळात देवीलाल याच्याशी तिचे सूत जुळले. ती त्याच्याशी चॅटींग करू लागली. अनेकदा त्यांच्यात व्हिडिओ कॉल होऊ लागले. व्हिडीओ कॅालवेळी देवीलाल याने तिचे नको त्या अवस्थेतील फोटोंचे स्क्रीन शॅाट काढून घेतले. 4 महिने त्यांच्यात हा प्रकार सुरू होता. नंतर महिलेने त्याच्याकडे कामाला जाणे बंद केले होते. (Pune Crime)

त्यानंतर देवीलाल आणि त्याच्या पत्नीने तुम्ही आमच्याकडेच कामाला यायचं असा तगादा लावला आणि धमकीही दिली.
महिलेने नकार दिल्यावर या दोघांनी तिचे फोटो व्हायरल (Photo Viral) करण्याची धमकी दिली.
तरीही तिने नकार दिला. त्या रागातून या दोघांनी तिच्या पतीसह इतर नातेवाईकांच्या व्हाटसअपवर हे फोटो प्रसारित केले आहे.
याप्रकरणी या दोघांविरोधात पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलमानुसार (Information Technology Act) गुन्हा दाखल केला
असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक (Police Inspector Sunil Mahadik) यांनी दिली.
याप्रकरणी अधिक तपास एपीआय प्रकाश वाघमारे (API Prakash Waghmare) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | baramati a case has been registered against husband and wife for making a pornographic photo of a woman viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा