Pune Crime | बारामतीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिलेला अटक

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शहर पोलिसांनी वेश्या व्यवसायावर कारवाईचा बडगा उगारला (Pune Crime) आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात देह व्यापारावर (Prostitution) कारवाई करत दलाल महिलेला ताब्यात (Arrested) घेण्यात आलं. ही कारवाई गुरुवारी (25 नोव्हेंबर) रोजी केली. पोलीसांनी गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाईमध्ये वेश्या व्यवसाय करत असलेल्या 2 महिलांची सुटका केली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यात शहरातील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयासमोरील चिमनशहा मळा परिसरातील एका लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, चिमनशहा मळा परिसरात 2 महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक (PI Sunil Mahadik) यांना मिळाली होती. या माहितीनूसार बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करण्याचे आदेश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. 2 पंचांना सोबत घेत आणि एक बनावट ग्राहक तयार करत त्याच्याकडे पैसे देण्यात आले. त्याने दलाल महिलेला भेटल्यानंतर तिने एक महिला दाखवली. दीड हजार रुपये घेत त्या महिलेसोबत बोगस ग्राहक गेल्यानंतर त्याने पीआय महाडीक यांना मोबाईलवर मिस्ड कॉल देत इशारा केला. (Pune Crime)

तर, तेथेच साध्या वेशामध्ये थांबलेल्या पोलिस पथकाने तेथील एका लॉजवर छापा टाकत दोघा महिलांना ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांनी सध्या रुई येथे वास्तव्यास असणाऱ्या (मुळ-माळशिरस, जि. सोलापूर) 22 वर्षीय महिलेची सुटका केली.
या प्रकरणी शहरातील रुई परिसरातील बयाजीनगर येथे राहणाऱ्या दलाल महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (Unethical Trade Prevention Act) गुन्हा (FIR) दाखल करत तिला अटक (Arrested) केली आहे.

 

दरम्यान, सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडीक (PI Sunil Mahadik)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे (API Prakash Waghmare)
यांच्यासह पोलिस कर्मचारी पवार, राऊत, हिंगणे, लाळगे आदींनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | baramati police second time raid prostitution caught city pune crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Huma Qureshi | ‘गॅंग्स् ऑफ वासेपुर’मधील वुमनियाच्या बोल्ड लूकनं सोशल मीडियाचा वाढवला पारा; फोटो व्हायरल

Baramati Crime | पोलिसांच्या भीतीने पळ काढत थेट नदीत उडी, एकाचा बुडून मृत्यू; संतप्त जमावाच्या हल्ल्यात 3 पोलिस जखमी, बारामती तालुक्यात प्रचंड खळबळ

MP Supriya Sule | ‘मोदी सरकार संविधान बदलू पाहतंय; भाजपला जोरदार विरोध करा, तरच देश वाचेल’