Pune Crime | वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला बारामती सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दुय्यम वागणूक दिल्याच्या आणि आर्थिक कोंडी केल्याच्या रागातून मुलाने वडिलांचा गळा चिरून निर्घृण खून केला. खून करुन पुरवा नष्ट करणाऱ्या आरोपी मुलाला बारामती सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना (Pune Crime) 2017 मध्ये घडली होती. अभय काटे असे शिक्षा झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.

 

घरामध्ये दुय्यम वागणूक मिळते, आर्थिक कोंडी केली जात असल्याच्या रागातून आरोपीने वडिल दिगंबर काटे यांचा गळा चिरुन खून केला. खून केल्यानंतर मृतदेहाची आणि गाडीची विल्हेवाट लावली. या घटनेत कोणीही प्रत्यक्षदर्शी नव्हता. वडिलांचा मृत्यू हा गळा चिरुन झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अभय काटे याने वडिलांचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. (Pune Crime)

 

गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी अभय काटे यानेच वडिल दिगंबर काटे यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणामध्ये अॅड. राजेश कातोरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणात 13 साक्षीदार तपासण्यात आले. हे प्रकरण प्रत्यक्ष परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होते. हा पुरावा ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश दरेकर यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

या प्रकरणात विशेष सरकारी वकील यांना अॅड. ज्ञानेश्वर माने यांनी मदत केली.
तर फिर्यादीच्या वतीने अॅड. सचिन झालटे, अॅड. समीर सहाने, अॅड. नीलिमा खर्डे यांनी काम पाहिले.

 

Web Title :- Pune Crime | Baramati Sessions Court life imprisonment to son who killed his father

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | बारामतीत नवविवाहितेबरोबर नियतीचा खेळ; लग्नाला आठवडा पण झाला नसताना नवऱ्याचा अकाली मृत्यू

Amit Shah | श्रद्धा वालकर हत्येवर गृहमंत्री अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया

Mahavitaran Employee – Court News | वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस 3 वर्षे सश्रम कारावास