क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | धक्कादायक ! ऑफिसमध्ये घुसून तरुणीवर चाकू हल्ला, बारामतीमधील आज सकाळी 10.30 ची घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामतीमध्ये (Baramati) आज (मंगळवार) सकाळी एक थरारक घटना समोर आली आहे. बारामतीमध्ये पर्यटनाचं बुकिंग (Tourist Booking) करणाऱ्या एका तरुणीवर ऑफिसमध्ये घुसून चाकूने वार (Knife Attack) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी तरुणाने संबंधित तरुणीच्या हातावर वार (Pune Crime) केले आहेत. ही घटना आज सकाळी 10.30 च्या सुमारास शहरातील केसरी टूर्सची (Kesari Tours) शाखा असलेल्या रजत टूर्सच्या कार्यालयात (Rajat Tours) घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस ठाण्याचे (Baramati City Police Station) पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक (Police Inspector Sunil Mahadik) यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत. (Pune Crime)

नेमकं काय घडलं ?
आज सकाळी 10.30 च्या सुमारास केसरी रजत टूर्सचं ऑफिस उघडल्यानंतर, आरोपी तरुण याठिकाणी आला होता.
त्याने मी काल आपल्या ऑफिसला येऊन गेलो. तुम्ही लवकर ऑफिस बंद केलं.
असं म्हणत महिलेच्या गळ्यात हात घातला.
आरोपी तरुणाने गळ्यातील सोन्याची साखळी (Gold Chain) ओढतोय की काय ? असं वाटल्याने महिलेने आरोपीचा हात धरला.
त्यानंतर आरोपीनं ‘माझा हात सोड’ म्हणत महिलेवर चाकूने वार केले.
यानंतर फिर्यादी महिलेनं त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
मात्र तो आपली चप्पल न घालताच तेथून पसार झाला.

 

Web Title :- Pune Crime | baramati youth knife attack on girl in her office Baramati City Police Station on the spot

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

 

 

Back to top button