Pune Crime | उधार देण्यास नकार दिल्याच्या रागातून मारहाण, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | सामान उधार देण्यास नकार दिल्याच्या रागातून एकाला बेदम मारहाण (Beating) करुन दुकानातील सामान रस्त्यावर फेकून दिल्याचा प्रकार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (bharati vidyapeeth police station) हद्दीत घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार आंबेगाव पठार (ambegaon pathar) येथे मंगळवारी (दि.24) रात्री साडेसहाच्या सुमारास (Pune Crime) घडली.

आजिंक्य संतोष काळे (रा. स.नं.25, गणेशनगर, आंबेगाव पठार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी सचिन जयेश पांड्या (वय-35 सुर्या बिल्डींग, पहिला मजला, आंबेगाव पठार) याने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी पांड्या यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दुकान आहे.
फिर्यादी यांनी आरोपीला उधार देण्यास नकार दिला.
याचा राग मनात धरुन आरोपीने दुकानातील अंड्याचे कॅरेट व चॉकलेटचे डबे रस्त्यावर फेकून दिले.
तसेच दुकानातील गल्ल्यामधून पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
तसेच हा गोंधळ सुरु असताना त्याठीकाणी जमलेल्या लोकांना आरोपीने हातात कोयता घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Beaten out of anger for refusing to lend, one arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Unlimited Data | 3 महिन्यांपर्यंत रोज मिळवा 5 GB सह अनलिमिटेड डेटा, जाणून घ्या कोणत्या कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान

ZP Pune Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! पुणे जि.प. मध्ये ‘या’ पदांसाठी लवकरच भरती

Pune Crime | पुण्याच्या कोरोना लसीकरण केंद्रामधील डाटा एन्ट्रीच्या कॉम्प्युटरची चोरी