Pune Crime | ‘तू पांढऱ्या पायाची आहेस’ असे म्हणून विवाहितेला मारहाण; पतीसह 5 जणांवर FIR

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | तू पांढऱ्या पायाची आहेस, माहेराहून पैसे घेऊन ये असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेला मारहाण (Beating) केली. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला वैतागून विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) फिर्याद दिली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती, सासरे, सासू, दिर, नणंद यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) मांजरी, वालचंदनगर येथे घडला आहे.

याप्रकरणी 31 वर्षीय विवाहित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi police station) फिर्याद दिली आहे.
गुन्हा हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सांगवी पोलिसांनी हा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती अजिनाथ हनुमंत कांबळे (Ajinath Kamble),
सासरे हनुमंत कांबळे (father-in-law Hanumant Kamble), सासु आनंदी कांबळे
(mother-in-law Anandi Kamble), दिर साईनाथ कांबळे आणि नणंद मनिषा चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिनाथ यांचे पीडित महिलेसोबत 2011 मध्ये लग्न झाले आहे.
लग्नानंतर पतीने पीडितेच्या इच्छेविरोधात अनैसर्गिक संभोग केला.
पीडितेने पतीला विरोध केला असता त्याने मारहाण करुन गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
तर इतर आरोपींनी माहेरवरुन पैसे घेऊन ये, तू पांढऱ्या पायाची आहे असे म्हणून पीडितेला शिवीगाळ व दमदाटी केली.
तसेच मारहाण करुन मानसिक (Mental) व शारीरीक (physical) त्रास दिला.
पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Beating a married woman as ‘you are white-footed’; FIR against 5 persons including husband

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | तुम्हाला सुरू करायचा असेल आपला बिझनेस तर मोदी सरकार देतंय 25 लाख रुपये, 31 पूर्वी येथे करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

Bank Scam | 4300 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपात सहभागी असलेल्या ‘या’ व्यक्तीच्या पत्नीने 9 महिन्याच्या बाळाला दिले 40 कोटी रुपयांचे गिफ्ट, जाणून घ्या

Tahsildar Jyoti Deore Audio Clip | पारनेरच्या तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश