×
HomeUncategorizedPune Crime | खिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून पत्नीला मारहाण; देवाच्या मूर्ती, फोटो...

Pune Crime | खिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून पत्नीला मारहाण; देवाच्या मूर्ती, फोटो नदीत बुडविले

पुणे : Pune Crime | स्वत: खिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर गेल्या २१ वर्षापासून पत्नी व मुलांनी खिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी पत्नीला त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यासाठी त्याने चक्क घरातील देवाच्या मूर्ती व फोटो नदीत टाकून दिले. (Pune Crime)

याप्रकरणी एका ४३ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रविंदरसिंह भंवरसिंह राजपुरोहित (वय ४३, रा. त्रिदलनगर सोसायटी, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २००१ पासून सुरु असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती राजपुरोहित याने २००१ मध्ये खिश्चन धर्म स्वीकारला.
तेव्हापासून पत्नीने व तिच्या आईवडिल मुलांनी खिश्चन धर्म स्वीकारावा, यासाठी तो शारीरीक व मानसिक त्रास देऊ लागला. फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन तसेच मुलाला खिश्चन धर्माच्या शाळेत टाकेल अशी धमकी देत होता. त्याने घरातील देवाच्या मूर्ती व फोटो नदीत टाकून फिर्यादी यांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे त्यांनी आता फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Beating his wife to convert to Christianity; Idols of God, photos immersed in the river

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rickshaw Strike | रिक्षाचालकांच्या अडचणीत वाढ? रॅपिडोला अ‍ॅग्रिगेटर परवाना देण्यावर पुनर्विचार करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे पुणे आरटीओला आदेश

MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Must Read
Related News