Pune Crime | महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण; 4 जणांवर FIR, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लाइटचे मीटर कट केल्याच्या रागातून तीन जणांनी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बेदम मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार कोंढवा येथे घडला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.5) सकाळी साडेअकराच्या सुमारास कोंढवा येथील भाग्योदयनगर येथील सार्वजनिक रोडवर घडला. याप्रकरणी (Pune Crime) चार जणांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ शंकर रामकिसन रोंढे (वय 32) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अफजल कादर कपाडीया, असिफ कादर कपाडीया, मोहमद अफजल कपाडीया व एका अनोळखी व्यक्ती विरोधात आयपीसी 353, 332, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी सिद्धार्थ चव्हाण हे भागोदयनगर,
गल्ली नं.5 येथील सार्वजनिक रोडवर शासकीय काम करत होते. त्यावेळी आरोपी यांनी आमचे लाइटचे मीटर कट
का केले अशी विचारणा करून फिर्यादी यांच्या अंगावर धाऊन गेले.
तसेच फिर्यादी यांच्या हातातील लाइट मीटर हिसकावून घेऊन दोघांच्या कानशिलात लगावली.
फिर्यादी यांना हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली.
आरोपींनी फिर्यादी करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Beating of Mahavitran officer; FIR against 4 people, incident in Kondhwa area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Mumbai High Court On Abortion | मुंबई उच्च न्यायालयाने दिली सशर्त गर्भपाताची परवानगी