Pune Crime | प्रेयसीनं दिला ‘दगा’ अन् मामानं दिली ‘धमकी’ ! पुण्यातील तरूणानं जीवन संपवलं, मामा अन् भाचीवर FIR; सुसाईड नोट सापडली अन्…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेयसी करत असलेली फसवणूक आणि तिच्या मामाने दिलेल्या धमकीमुळे एका तरुणाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटवरुन (Suicide Note) कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) प्रेयसी व तिच्या मामाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

याप्रकरणी तरुणाची आई राजश्री दीपक कदम (वय ३९, रा. किष्किंदानगर, कोथरुड) यांनी कोथरुड पोलिसांकडे (Kothrud Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन नर्‍हे येथे राहणार्‍या प्रेयसी व तिचा मामाच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत ऊर्फ मोन्या दीपक कदम याचे एका तरुणीवर प्रेम होते. परंतु ती आपल्याला फसवत आहे, तसेच ती आपल्याला सोडून जाईल, या तणावात प्रशांत सतत असायचा. या तरुणीच्या मामाला त्यांचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. तो १५ नोव्हेबर रोजी पहाटे कदम यांच्या घरी आला. त्याने माझ्या भाचीचा नाद सोडून दे अशी धमकी देऊन शिवीगाळ (Pune Crime) केली.

 

प्रेयसी करत असलेली फसवणूक आणि तिच्या मामाने दिलेली धमकी हे सर्व असाह्य झाल्याने
प्रशांतने घरी साडीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात ‘‘मी मोन्या कदम मी आयुष्यात प्रेम केलं.
तिने मला फसवले. तिच्या मामाने मला धमकी दिली. आणि मी हे केलं.
त्या मुलीनी मला धोका दिला म्हणून मी केलं’’ असे त्यात म्हटले होते.
पोलिसांनी दोघांवर गुन्हा (Kothrud Crime) दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Beloved cheat ! Young man from Pune dies, FIR against lover and her uncle; Suicide note found kothrud police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा