Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस ! महिलांच्या मांडीवर जाऊन बसणार्‍या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रस्त्याने जाणार्‍या तरुणी, महिलांना शिट्ट्या वाजवणे, पाठलाग करुन प्रसंगी भररस्त्यात त्यांची छेड काढण्याचे (Molestation Case) प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. आता या रोड रोमियोची (Road Romiyo) मजल आणखीच वाढली असून चहा पित बसलेल्या महिलांच्या मांडीवर जाऊन बसण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) दोघांना अटक केली आहे. अमित इंद्र नाथ (वय ३०, रा. दत्तप्रसाद सोसायटी, आंबेगाव खु़) आणि लक्ष्मण रामबहादुर साहु (वय २७, रा. चंद्रागण सोसायटी, आंबेगाव बु़ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

याप्रकरणी शिवणे (Shivne) येथील एका ३० वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार आंबेगाव (Ambegaon) येथील आईसाहेब चहा विक्री स्टॉलसमोर २६ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांची मैत्रिण आईसाहेब चहा स्टॉल येथे चहा पित बसल्या होत्या. तेव्हा आरोपी शिट्टया वाजवत तेथे आले. फिर्यादी या बसल्या असताना जाणून बाजून ते फिर्यादीच्या मांडीवर येऊन बसले व त्यांच्या पोटाला हात लावून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादीने त्याचा जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ करुन ढकलून देऊन मारण्याची धमकी (Pune Crime) दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक घोगरे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Bharti Vidyapeeth Police Arrest Two in Molestation Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या