Pune Crime | कौटुंबीक वादातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पुणे पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | कौटुंबिक कलहातून (Family disputes) राहत्या घरात ओढणीने आत्महत्येचा प्रयत्न (attempt suicide) करणाऱ्या तरुणाचे पुणे पोलिसांनी (Pune Police) प्राण वाचवले. ही घटना गुरुवारी रात्री पुण्यातील (Pune Crime) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (bharti vidyapeeth police station) हद्दीत घडली. पोलिसांना तरुणाचे मन परिवर्तन (mind Change) करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाच मिनिटात घटनास्थळी धाव घेत तरुणाचे प्राण वाचवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

 

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील बीट मार्शल ब्रह्मानंद केंद्रे (Beat Marshall Brahmananda Kendra) व नानासो खाडे (Nanaso Khade) हे गुरुवारी रात्री हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी केंद्रे यांना बिनतारी संदेश यंत्रणेवर एक तरुण आत्महत्या करत असल्याचा कॉल आंबेगाव येथील सिंहगड कॅम्पस (Sinhagad Campus Ambegaon) येथून मिळाला. घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता केंद्रे आणि खाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी आपल्याच घरात एक तरुण खुर्चीवर उभे राहून ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत होता.

 

ब्रह्मानंद केंद्रे यांनी तात्काळ या तरुणाला खली घेऊन त्याला समजावून सांगत त्याचे मन परिवर्तन केले. आंबेगाव पठार मार्शल यांनी केलेल्या तात्काळ कारवाईमुळे एका तरुणाचे प्राण वाचले. तसेच त्याचे आत्महत्या करण्यापासून मनही परिवर्तन केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Inspector of Police Jagannath Kalaskar) यांनी केंद्रे आणि खाडे यांचे कौतुक करत अभिनंदन केले.

 

Web Title : Pune Crime | bharati vidyapeeth police save youth life suicide attempt pune crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! जि. प. मधील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस, ऑफीसरनं काढला पळ; कार्यालयात एकच खळबळ

Pune Crime | अल्पवयीन मुलीशी मैत्रीचे नाटक ! 5 वर्षांपासून कुटुंबाला दहशतीखाली ठेवणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल; हडपसर परिसरातील घटना

Anushka Sharma-Virat Kohli | अनुष्काचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं विराटचं कौतुक, जाणून घ्या कारण