Pune Crime | सराफी व्यावसायिकावर भरदिवसा हल्ला करुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील एका सराफ व्यावसायिकावर (Goldsmith) चाकूने हल्ला (Knife Attack) करुन ज्वेलर्स दुकानात दरोडा (Robbery) टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील फरार आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police Station) सापळा रचून धायरी (Dhayari) येथून अटक (Arrest) केली. ही घटना गुरुवारी (दि.19) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रूक (Ambegaon Budruk) येथील ‘वैभवलक्ष्मी ज्वेलर्स’ मध्ये घडली (Pune Crime) होती.

 

गौरव विजय रायकर Gaurav Vijay Raikar (वय -25,रा. पोकळे वस्ती, धायरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विनोदकुमार भागचंद सोनी Vinodkumar Bhagchand Soni (वय-42 रा. आंबेगाव बुद्रुक) हे या घटनेत जखमी झाले असून त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

विनोदकुमार सोनी यांचे आंबेगाव बुद्रकमध्ये वैभवलक्ष्मी ज्वेलर्स (Vaibhavalakshmi Jewelers) नावाचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एकाने खरेदी करण्याचे बहाण्याने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर सोनी यांच्यावर चाकूने हल्ला करुन त्यांच्यावर वार केले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी घटनास्थळी धाव घेत तपास पथकाला (Investigation Team) आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिला. सराफ व्यावसायिकावर हल्ला करणारा आरोपी धायरीमध्ये असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार राहूल तांबे (Rahul Tambe) यांना मिळाली. त्यानुसार पथकाने आरोपी गौरव रायकर याला सापळा रचून ताब्यात घेतले.

ही कामगिरी उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil), वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar),
सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad), पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde),
पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता (PSI Dheeraj Gupta), रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, सचिन पवार,
हर्षल शिंदे, आकाश फासगे, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, शिवदत्त गायकवाड, धनाजी धोत्रे,
सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सांवत यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Bharti Vidyapeeth police arrested a man who tried to rob a goldsmith by attacking him all day long

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol-Diesel Rates Reduced | केंद्र सरकारनंतर राज्याचा देखील मोठा निर्णय ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त, जाणून घ्या

 

Ajit Pawar On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेनंतर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी हवं ते म्हणावं, आम्हाला मात्र…’

 

Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना फॉर्म्युल्यावर संभाजीराजेंमध्ये समझोता