Pune Crime | बिल्डरकडे खंडणी मागणाऱ्या सराईतास भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बांधकाम व्यावसायिक व त्यांच्या भागीदाराकडे एक लाख रुपये खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. योगेश उर्फ सनी अजिनाथ परडे (वय 33, रा. भिमाले कॉम्प्लेक्स, मार्केट यार्ड) असे अटक (Pune Crime) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

याबाबत ऋषी अनंता सुतार (वय 37, रा. धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी पारडे याच्यावर आयपीसी 387, 384, 452, 504 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार 25 जून 2022 ते 9 नोव्हेंबर 2022 या कालावधीत कात्रज येथे घडला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकाम व्यवसाय आहे.
आरोपी योगेश पारडे याने फिर्यादी यांच्या कात्रज येथील स्वराज हाईट येथील ऑफिसमध्ये येऊन फिर्यादी व
त्यांचे व्यावसायिक भागीदार प्रवीण झेंडे यांच्याकडे एक लाख रुपये खंडणी मागितली.
आरोपीने त्यांच्याकडून 68 हजार 500 रुपये खंडणी वसूल केली आहे. 9 नोव्हेंबर रोजी आरोपीने फिर्यादी यांना फोन करून उर्वरित पैशांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Bharti Vidyapeeth police arrested innkeepers who demanded extortion from the builder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | वॉटर प्युरिफायर मटेरियल परस्पर विकून कंपनीची 48 लाखांची फसवणूक; वाघोली येथील प्रकार

COEP Cource Closed | सीओईपीचा रेल्वे-मेट्रो अभ्यासक्रम बंद; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात?