Pune Crime | खुन करुन फरार झालेल्या तीन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रॉडने आणि दगडाने बेदम मारहाण करुन तरुणाचा खून (Murder) करुन फरार झालेल्या तीन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश निवृत्ती रेणुसे (वय-27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रकाश याच्यावर 13 डिसेंबर रोजी रात्री आंबेगाव खुर्द येथील दुगड शाळेजवळ (Dugad School Ambegaon Khurd) बेदम मारहाण करण्यात (Pune Crime) आली होती. त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचार सुरू असताना त्याचा 19 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता.

याप्रकरणी आदित्य महेश कांचन (वय-20 रा. कात्रज, मुळ रा. उरळीकांचन), संकेत सुरेश पवार (वय-19 रा. कात्रज, मुळ रा. साळुंगण, ता. भोर), अभिजीत किसन सावंत (वय-24 रा. कात्रज) यांना अटक (Pune Crime) केली आहे. याबाबत पोलीस हवालदार अनिल प्रल्हाद भोसले (Police Constable Anil Prahlad Bhosale) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे व धनाजी धोत्रे यांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन मंगळवारी (दि.20) तीन आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक (Police Inspector Vijay Puranik) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior Police Inspector Srihari Bahirat),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal),
पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta), पोलीस अंमलादार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे,
अभिजीत जाधव, राहुल तांबे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अवधुत जमदाडे,
सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Bharti Vidyapeeth Police arrested three accused who absconded from the murder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nilesh Rane | रत्नागिरी हातिवले टोल नाक्यावर निलेश राणे आक्रमक

Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; अधिवेशनात फडणवीसांची घोषणा

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक