Pune Crime | 8 महिन्यापासून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खुनाच्या प्रयत्नात मागील आठ महिने फरार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (Bharati Vidyapeeth Police Station) तपास पथकाने सापळा रचून (Pune Crime) अटक केली. किरण दिलीप मोरे Kiran Dilip More (वय-24 रा. कोरेगाव पार्क) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर आयपीसी 307, 34 नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल आहे.

 

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे (Dhanaji Dhotre) व सचिन गाडे (Sachin Gade) यांना माहिती मिळाली की, खुनाच्या प्रयत्नातील (Attempted Murder) 8 महिने फरार असलेला आरोपी किरण मोरे हा आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. (Pune Crime)

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan), वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar), पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav), पोलीस निरीक्षक विजय पुराणिक (Police Inspector Vijay Puranika) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक धीरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta), पोलीस अंमलदार नरेंद्र महांगरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, राहुल तांबे, सचिन गाडे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : –  Pune Crime | Bharti Vidyapeeth Police arrests absconding accused of attempted murder since 8 months

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा