Pune Crime | कोणार्क एक्सप्रेसमधून 8 किलो गांजा जप्त

पुणे / दौंड : पोलीसनामा ऑनलाइन  पुणे जिल्ह्यात (Pune Crime) मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त (drugs seized) करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड येथे लोहमार्ग पोलिसांनी (Daund Railway Police) केलेल्या कारवाईत 8 किलो गांजा जप्त करण्यात आला असून दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही कारवाई दौंड लोहमार्ग पोलिसांनी भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेसमध्ये (Bhubaneswar-Mumbai Konark Express) शुक्रवारी (दि. 12) केली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे (API Yuvraj Kalkutge) यांनी दिली.

 

चित्तरंजन मांझी व पपुन रामचंद्र प्रधान (दोघे रा. धनंजयापुर, गंजाम, ओडिशा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून चार पाकिटातील एकूण 8 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी ही कारवाई कुर्डुवाडी ते दौंड रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या गाडीत केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावरुन शुक्रवारी रात्री कोणार्क एक्सप्रेस दौंडच्या दिशेने रवाना झाल्यावर बी-6 डब्यातील दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.
गस्तीवरील रेल्वे सुरक्षा दलाचे हवालदार जवळकोटे यांनी नियंत्रण कक्षाशी (Control room) संपर्क साधून याची माहिती दिली.
त्यानंतर कोणार्क एक्सप्रेस दौंड रेल्वे स्थानकावर आल्यानंतर बी-6 डब्यातील प्रवाशांची लोहमार्ग पोलीस आणि दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलिसांकडून
(Daund Railway Security Force Police) संयुक्तपणे झडती घेण्यात (Pune Crime) आली.

या झडतीत दोघांकडे 8 किलो गांजा आढळून आला. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक तेजप्रकाश पाल (Inspector Tejprakash Pal),
लोहमार्ग पोलीस दलाचे फौजदार ताराचंद सुडगे (Tarachand Sudge), रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक फौजदार गुजर व मीना यांनी दोघांना ताब्यात घेतले.
हा गुन्हा कुर्डुवाडी हद्दीत घडला असल्याने दौंड लोहमार्ग पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपासाकरीता कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांकडे (Kurduwadi Railway Police) वर्ग केला आहे.

 

Web Title : Pune Crime | bhuvneshwar mumbai konark express police 8 kg drugs seized at daund two arrest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aadhaar card number | तुमचा आधार नंबर सोशल मीडियावर शेअर करताय?, मग जाणून घ्या UIDAI च्या महत्वाच्या सुचना

Crime News | पत्नीनं घरात लावला छुपा कॅमेरा, पतीचं मैत्रिणीशी असलेलं ‘झेंगाट’ झालं CCTV मध्ये कैद अन्…

Reserve Bank of India | ‘RBI’ ची मोठी कारवाई ! ग्राहकांना महाराष्ट्रातील ‘या’ बँकेतून फक्त 1 हजार रुपयेच काढता येणार