Pune Crime | खून करुन फरार झालेल्या आरोपीच्या बिबवेवाडी पोलिसांनी तासाभरात आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibwewadi Police Station) हद्दीत तरुणाच्या डोक्यात अवजड वस्तूने प्रहार करुन खून (Murder) केल्याची घटना सोमवारी (दि.10) उघडकीस आली होती. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीच्या अवघ्या तासाभरात मुसक्या (Pune Crime) आवळल्या आहेत. ही कारवाई अप्पर ओटा, ओसवाल दवाखान्यासमोर करण्यात आली.

विशाल ओव्हाळ (वय-26 रा. पद्मावती वसाहत, पद्मावती, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवदत्त उर्फ डि उर्फ दत्तात्रय चंद्रकांत सकट (वय-34 रा. अप्पर ओटा नं. 276 बिबवेवाडी, पुणे मुळ रा. माढा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश विठ्ठल ओव्हाळ (वय-46 रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

बिबवेवाडी येथील महेश सोसायटी चौकातील राजीव गांधी कॉम्प्लेक्सच्या (Rajiv Gandhi Complex) मागील पार्किंगमध्ये एका तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन मृतदेहाची ओळख पटवली.
या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) तपासले.
मात्र आरोपीची काहीच माहिती मिळाली नाही. दरम्यान पोलिसांनी मयत तरुणाच्या मित्राकडे आणि नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु काहीच माहिती मिळाली नाही. (Pune Crime)

दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे यांना या गुन्ह्यातील आरोपी शिवदत्त उर्फ डि सकट असल्याची माहिती मिळाली.
तसेच तो आपल्या माढा (Madha) या मुळगावी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असता बातमीदाराने दिलेल्या वर्णनचा एक व्यक्ती ओसवाल दवाखान्यासमोर चालत जाताना दिसला.
पोलिसांनी शिताफीने त्याला पकडून सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे (Senior Police Inspector Sunil Jhaware) , पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार संतोष पाटील, शाम लोहमकर, गणेश दुधाने दैवत शेडगे, शिवाजी येवले, सचिन फुंदे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Bibvewadi police arrest criminal in murder case

 

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात