Pune Crime | ‘इधर धंदा करना है तो मै जब भी आऊंगा पैसे देनेका, नही तो कोयतेसे काट डालूंगा’; कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणार्‍या दोघा गुंडांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोयत्याचा धाक दाखवून व्यावसायिकांना (Businessman) धमकावुन खंडणी (Ransom Case) उकळणार्‍या दोघा रेकॉर्डवरील गुंडांना (Pune Crimenals) बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police) अटक (Arrest) केली आहे. कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि अक्षय भालके Akshay Bhalke (दोघे रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

याप्रकरणी महादेव मांगीलाल जाट Mahadev Mangilal Jat (वय ३३, रा. बिबवेवाडी) यांनी बिबेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३३/२२) दिली आहे. ही घटना १० ते १५ जुलै २०२२ दरम्यान घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बिबवेवाडी येथे बालाजी सुपर मार्केट (Balaji Super Market) हे दुकान आहे. कुंदन शिंदे याने फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून २ हजार रुपयांची मागणी केली. ‘‘मेरेको जानता नही क्या, मै इस एरीया का भाई हू, इधर धंदा करना है, तो मै जब भी आऊंगा मुझे पैसे देने का, नही तो कोयतेसे तेरे को काट डालूंगा’’ (Extortion Case) असे म्हणून पोलिसात तक्रार केली, तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
फिर्यादी यांच्याकडून १ हजार ८०० रुपये घेऊन गेला.
अक्षय भालके याने कुंदन शिंदे याच्या नावाने २ हजार रुपयांची मागणी केली.

फिर्यादी यांनी त्यास नकार दिला असता दोघे परत तेथे आले.
कुंदन शिंदे याने कोयता उगारुन ‘‘मी इथला भाई आहे.
माझ्यामध्ये कोण आले तर कोणाला सोडणार नाही, एकएकाला कापून टाकीन,’’
असे म्हणून आरडा ओरडा करुन दहशत माजवून शेजारच्यांमध्ये भिती निर्माण केली.
पोलीस उपनिरीक्षक आदलिंग (Sub-Inspector of Police Adaling) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Bibvewadi Police Arrest Kundan Shinde And Akshay Bhalke In Extortion Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा