Pune Crime | दारु पिण्यास पैसे नसल्याने मित्राच्या मदतीने पत्नीचे दागिने चोरले, बिबवेवाडी पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्राच्या मदतीने स्वत:च्या पत्नीचे दागिने चोरणाऱ्या (Jewelry Thief) पती (Husband) आणि त्याच्या मित्राला (Friend) बिबवेवाडी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपींकडून तीन गुन्हे उघडकीस आणून 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) मंगळवारी (दि. 17) फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आयपीसी 380, 109, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

आरोपी पती रोहीत अशोक बनसोडे Rohit Ashok Bansode (वय-32 रा. अण्णाभाऊ साठेनगर, बिबवेवाडी) त्याचा मित्र संदीप शिवाजी जाधव Sandeep Shivaji Jadhav (वय-27 रा. टिळेकर नगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी रोहीत बनसोडे याने मित्राच्या मदतीने स्वत:च्या घरातील स्टीलच्या डब्यातील 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) आणि रोख रक्कम (Cash) असा एकूण 37 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी महिलेचा पती व त्याच्या मित्राने गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता, ते दोघे एकत्र दारु पिणारे मित्र असून फिर्यादी यांच्या पतीकडे दारु पिण्यास पैसे नसल्याने मित्राच्या मदतीने घरातील पत्नीचे दागिने चोरल्याची कबुली दिली. याशिवाय आरोपींनी एकूण तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Senior Police Inspector Vilas Sonde), पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar) यांच्या सुचनेनुसार, तपास पथकाचे (investigation Team) सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे (API Pravin Kalukhe), सहायक पोलीस निरीक्षक किरण देशमुख (API Kiran Deshmukh), सहायक पोलीस उप निरीक्षक राजकुमार बारबोले (ASI Rajkumar Barbole), पोलीस अंमलदार शाम लोहोमकर, अमित पुजारी, सतीश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, तानाजी सागर, शिवाजी येवले, राहूल शेलार, ज्ञानेश्वर डाके यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Bibvewadi police arrest two for stealing wife’s jewelery with help of friend

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त