Pune Crime | आर्थिक व्यवहारावरुन अपहरण करण्याचा प्रकार, बिबवेवाडी पोलिसांकडून एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आर्थिक व्यवहारातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण (Kidnapping) करण्याचा प्रकार बिबवेवाडीत बुधवारी घडला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक (Pune Crime) केली आहे.

 

अशोक बाळशीराम फापळे Ashok Balshiram Phaple (वय – 44, रा. बेलापूर, अहमदनगर) असे अटक (Arrest) केलेल्याचे नाव आहे. त्याचे साथीदार बाळासाहेब वामन (Balasaheb Vaman), ओंकार बाळासाहेब वामन Omkar Balasaheb Vaman (रा. जुन्नर) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी बिबवेवाडीतील ओम मेघस्पर्श सोसायटीत राहणार्‍या एका 53 वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता नेहमीप्रमाणे कामानिमित्त घरातून बाहेर पडले.
फिर्यादीचे पतीचे ओळखीचे अशोक फापळे यांच्यात काही आर्थिक व्यवहार होते.
फिर्यादीचे पती घरातून बाहेर पडल्यावर फापळे व त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन जबरदस्तीने पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये बसवून पळवून नेले,
अशी तक्रार त्यांनी दिली होती. या घटनेनंतर तासाभराने फापळे याने फिर्यादीच्या पतीला पुन्हा जागेवर आणून सोडले.
पोलिसांनी अशोक फापळे याला अटक केली आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Bibvewadi police arrested a person in case of kidnapping due to financial transaction

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Railway Concession to Senior Citizen | ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात कधीपासून मिळणार सवलत? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी माहिती

 

Shivsena | ‘शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते’; केंद्रीय राज्यमंत्र्याचा गंभीर आरोप

 

Maharashtra Rains | राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांत दमदार पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा ‘Alert’