Pune Crime | पुण्यात जीएसटी विभागाची मोठी कारवाई ! 41 कोटींचे टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या व्यापाऱ्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात जीएसटी विभागाने (GST Department Pune) मोठी कारवाई केली आहे. बनावट खरेदी बिलांच्या आधारे तब्बल 41 कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (Bogus Input Tax Credit) घेऊन शासनाचा 7 कोटी 38 लाख रुपयांचा टॅक्स बिडविणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्याला वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने अटक (Arrest) केली आहे. प्रवीण भबूतमल गुंदेचा (Praveen Bhabutmal Gundecha) असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली (Pune Crime) आहे.

जिरावाला मेटल्स (Jirawala Metals) या व्यापाऱ्याने जवळपास 41 कोटी रुपयांचा बनावट खरेदी बिलांच्या आधारे बोगस इनपूट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाचा 7 कोटी 38 लाखांचा महसूल (Revenue) बुडवला. याबाबत प्रवीण गुंदेचा याच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे यांना आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले.(Pune Crime)

सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून जीएसटी विभाग कर चुकविणाऱ्या व्यावसायिकांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे या आर्थिक वर्षात आतापर्य़ंत 10 कारवाया करण्यात आल्या आहेत. सहायक आयुक्त सतीश पाटील (Assistant Commissioner Satish Patil), सचिन सांगळे (Sachin Sangle), दत्तात्रय तेलंग (Dattatreya Telang) व अन्वेषण विभागातील राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) यांचा या कारवाईमध्ये सहभाग होता.

जीएसटी विभागाकडे बोगस व्यापाऱ्यांची माहिती असून भविष्यात मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती अपर राज्यकर आयुक्त पुणे क्षेत्र धनंजय आखाडे (Additional State Tax Commissioner Pune Area Dhananjay Akhade) यांनी दिली.

Web Title : Pune Crime | Big action of gst department in pune 41 crore
tax credit trader Praveen Bhabutmal Gundecha arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर