Pune Crime | ‘पुणे ग्रामीण’ची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरातून 50 लाखाचा गांजा जप्त; 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक

पुणे / यवत : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) पाटस परिसरात रविवारी (दि.26) मध्यरात्री एकच्या सुमारास 30 लाख रुपयांचा 167 किलो गांजा जप्त (Cannabis Seized) करुन 78 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे (Yavat Police Station) पोलीस निरीक्षक नारायण पवार (Police Inspector Narayan Pawar) यांनी दिली आहे. याप्रकरणी महाराष्ट्रासह (Maharashtra) आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथील 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

रविकुमार जागेश्वराव पुपल्ला (रा. झमिदागुमिल्ली वागुमिल्ली ता. जि. कृष्णा, आंध्र प्रदेश), रवि कॉटया अजमेरा (रा. विजयवाडा, ता. कंखीपाट जि.कृष्णा, आंध्र प्रदेश), उमेश खंडु थोरात (रा. मंचर, ता. आंबेगाव, पुणे), युवराज किसन पवार (रा. मुथळा ता. मुथळा, जि. बुलढाणा), उत्तम काळु चव्हाण (रा.करवंड ता. चिखली, जि. बुलढाणा), प्रकाश एन व्यंकेटेश्वराव (रा. विजयवाडा, ता. कृष्णा जि. कंळीवाळ, आंध्र प्रदेश), किसन शालीमार पवार (रा. मुथळा, ता. मुथळा, जि. बुलढाणा, महिला आरोपी रुक्मिणीबाई रुपराव पवार (रा. ढाकरखेड, ता. चिखली, जि. बुलढाणा), मिना युवराज पवार (रा. ढाकरखेड ता. चिखली जि. बुलढाणा), ममता उत्तम चव्हाण रा. करवंड ता. चिखली, जि. बुलढाणा), लालाबाई देवलाल चव्हाण (रा. चिखली ता. चिखली जि. बुलढाणा), ललिता हिरालाल पवार (रा. ढाकरखेड ता. चिखली, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या 7 परुष आणि 5 महिलांची नावे आहेत. त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना माहिती मिळाली की, सोलापुर-पुणे महामार्गाने दोन मालवाहतुक करणारे ट्रक हे आंध्र प्रदेश, कर्नाटक (Karnataka) राज्यातुन पुणे (Pune) येथे विक्रीसाठी गांजा घेऊन जात आहेत. मिळालेल्या माहीच्या आधारे पोलिसांनी दोन पथके तयार करुन पहाटे दीडच्या सुमारास पाटस गावच्या हद्दीत सापळा रचला. पोलिसांनी एपी 16 टी.जी 2256 आणि एपी 7 टीएम 7799 असे दोन मालवाहतुक करणारे दोन ट्रक अडवले. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता ड्राव्हर सीटच्या बाजूला 6 पिशव्यामध्ये वेगवेगळ्या बंद पाकीटात 167.25 किलोग्रॅम गांजा आढळून आला. याची किंमत 30 लाख 10 हजार 500 रुपये असून पोलिसांनी गांजा आणि दोन ट्रक असा एकूण 78 लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime)

ही कारवाई पुणे ग्रामीण (Pune Rural Police) पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते (Addl SP Milind Mohite), उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस (SDPO Rahul Dhas) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे (API Keshav Wable), पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले (PSI Padmaraj Gample), पोलीस नाईक गणेश सोनवणे, विशाल गजरे, विकास कापरे, पोलीस हवालदार जे.एम. भोसले, भानुदास बंडगर, रविंद्र गोसावी, मेघराज जगताप, महेंद्र चांदणे, नुतन जाधव, प्रमोद गायकवाड, सुजित जगताप, दिपक यादव, तात्याराम करे, गणेश मुटेकर, आनंद आहेर, धावडे, चालक सत्यवान जगताप, विजय आवळे, पोलीस मित्र रामा पवार, निखिल अवचट यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Big action of Pune Rural Police ! Yavat police seize 50 lakh cannabis from Patas area; 7 men and 5 women arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरण! देवेंद्र फडणवीसच मुख्य साक्षीदार; राज्य सरकारचा न्यायालयात दावा

Water Drinking Habits | पाणी पिण्याने सुद्धा होऊ शकते का नुकसान? केव्हा, कसे आणि का जाणून घ्या 5 योग्य पध्दती

Bombay High Court | ‘रात्री महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे विनयभंगच’

Shani Dev | 2022 मध्ये अडीच वर्षानंतर ’शनी’ बदलणार ‘रास’, जाणून घ्या कुणाला सुरू होईल ‘अडीचकी’ आणि ‘साडेसाती’

Bathroom Stroke | हिवाळ्यात येणाऱ्या बाथरूम स्ट्रोकबद्दल तुम्हाला माहिती आहे?, जाणून घ्या कशी घ्यावी खबरदारी