Pune Crime | पुणे शहरात रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या बोटॅनिका, मॅश, रुफ टॉप व्हिलेज, सुफीज, जश्न आणि सायक्लॉन वर कारवाई ! हुक्का पार्लरवर कारवाई; बड्या हॉटेल्सच्या मालकासह 7 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पहाटेपर्यंत सुरु असलेल्या हॉटेल (Hotels In Pune) आणि बार वर (Bar And Restaurants In Pune) समाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) कारवाई करुन 7 जणांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act) कलम 33 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केतन किसन तापकिर (Ketan Kisan Tapkir), कुणाल किसन तापकिर (Kunal Kisan Tapkir), अभिषेक दत्तात्रय जगताप (Abhishek Dattatraya Jagtap) तसेच हुक्का सर्व्हिस देणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

शहरात पहाटे पर्य़ंत सुरु असलेल्या हॉटेल आणि बारमध्ये तरुणांच्या सुरु असलेल्या हुक्का पार्ट्यांमुळे (Hookah Parties In Pune) शहरात कायदा सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सामाजिक सुरक्षा विभागाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 1 मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन व रमजान ईदच्या (Ramadan Eid) पार्श्वभूमीवर रात्री उशीरापर्य़ंत सुरु असलेल्या हॉटेल, बार यांना सुचना देण्यात आल्या होत्या. (Pune Crime)

 

शनिवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल्स बारवर तसेच हुक्का पार्लवर (Hookah Parlours In Pune) कारवण्यासाठी पुणे पोलीस (Pune Police) दलात हजर झालेले 10 परिक्षाविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक व अंमली पदार्थ पथकाचे (Anti Narcotics Cell, Pune) अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे विशेष मोहिम (Special Campaign) राबवली. शनिवारी व रविवारी पहाटे दरम्यान पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या (Bundgarden Police Station) हद्दीतील बोटॅनिका (Botanica), कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील मॅश (Mash) आणि रुफ टॉप व्हिलेज (Roof Top Village), वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीतील जश्न (Jashn) आणि सुफीज (Sufis) आणि सहकार नगर पोलीस ठाण्यातील सायक्लॉन अशा वेगवेगळ्या हॉटेल्स बार वर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करुन रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल, बारवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. यामध्ये धनकवडी (Dhankawadi) येथील सरस्वती कॉम्प्लेक्समधील कॅफे सायक्लोन (Cafe Cyclone) मध्ये मध्यरात्री 2.20 पर्य़त अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का बारवर छापा टाकून करावाई करण्यात आली. या कारवाईत 47 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन हुक्का पार्लरचा मालक केतन तापकिर (वय-26), कुणाल तापकिर (वय-29), बार व्यवस्थापक अभिषेक जगताप (वय-22) यांच्यासह हुक्का सर्व्हिस करणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखालीसामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे (NSG API Laxman Dengle)  पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar)
तसेच 10 परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग, अंमली पदार्थ विरोधी पथक एक चे पोलीस अंमलदार  यांनी संयुक्तपणे केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Big Action on Botanica, Mash, Roof Top Village, Sufis, Jashn and Cyclone which started till late night in Pune city! Action on hookah parlor; FIR against 7 persons including owners of big hotels

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही’; फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल 

 

Liver | ‘या’ सवयींमुळे होत यकृत निकामी, जीवनशैलीत बदल करा नाहीतर आजारी पडाल

 

Buttermilk | उन्हाळ्यात ताकाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं, पण ‘या’ लोकांसाठी अडचणी वाढू शकतात; जाणून घ्या