Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील खराडी अ‍ॅग्रो ट्रेडींग कंपनीचा (Kharadi Agro Trading Company) विकसन करारनामा (Agreement) बनावट कागदपत्रांच्या आधारे रद्द करुन ती जमीन दुसऱ्या कंपनीस विक्री केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) चार जणांवर फसवणुकीचा (Fraud) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2008 ते 2013 दरम्यान वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथे घडला आहे.

 

हानिफ सोमजी (Hanif Somji), सोहेल सोमजी (Sohail Somji), अनलेश सोमजी (Alnesh Somji), जेनिस सोमजी Janice Somji (सर्व रा. बोट क्लब रोड, पुणे – Boat Club Road, Pune) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी खराडी अ‍ॅग्रो ट्रेडींग कंपनीचे संचालक इकबाल मस्तान शेख Iqbal Mastan Shaikh (वय-37 रा. हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे खराडी अ‍ॅग्रो ट्रेडिंग कंपनीचे संचालक होते. कंपनीने त्यांना 2010 साली संचालक पदावरुन कमी करण्यात आले. यानंतर या कंपनीचे निझार मेवानी (Nizar Mewani) व नुरजहा मेवानी (Nurjaha Mewani) हे संचालक होते. 2015 मध्ये फिर्यादी कंपनीचे संचालक झाले. दरम्यान कंपनीने हनिफ सोमजी याच्याकडून वडगाव शेरी येथील 6.6 आर जमीन विकसन करारनामा करुन घेतली होती. हा करारनामा कंपनीच्या वतीने अलनेश सोमजी याने केला होता. या मोबदल्यात कंपनीने हनिफ सोमजी याला 33 लाख रुपये दिले होते. त्यानंतर हनिफ सोमजी याने कंपनीच्या नावाने दस्त लिहून दिला होता.

 

त्यानंतर 2013 मध्ये आरोपी हानिफ सोमजी आणि सुर्या रियालिटी प्रा. लि. (Surya Reality Pvt. Ltd.) यांनी मिळून फिर्यादी यांच्या कंपनीने खरेदी केलेली जमीन शाम मानकर (Sham Mankar) व इतर भागिदारांना विकली. हानिफ सोमजी याने कंपनीच्या वतीने दस्तावर सही केली. यासाठी आरोपींनी संगनमत करुन दस्त करुन देताना कंपनीचे कुलमुख्यत्यारपत्र रद्द केले. (Pune Crime)

आरोपींनी खरेदीखत करुन देताना फिर्यादी यांच्या कंपनीच्या नावाने चेक घेतले.
तसेच फिर्यादी यांच्या कंपनीच्या नावाने तीन बँकांमध्ये बनावट खाते उघडून त्यामध्ये धनादेश वटवले.
प्रत्यक्षात फिर्यादी यांची आरोपींनी धनादेश वटवलेल्या बँकांमध्ये खाते नाहीत.
आरोपींनी बँक खाते उघडताना कंपनीचे बनावट कागदपत्र सादर करुन व त्यावर खोटे रबरी शिक्के वापरुन
कंपनीचे बनावट अकाउंट सुरु केल्याचे फिर्य़ादी म्हटले आहे.

 

फिर्यादी यांनी खरेदीखत पाहिले असता हानिफ सोमजी, सोहेल सोमजी यांनी सुर्या रियालिटी तर्फे संमती देणार
म्हणून सही करुन त्याचे नातेवाईक अनलेश सोमजी जेनिस सोमजी यांनी आपसात संगनमत करुन
फिर्याजी यांची जमीन शाम मानकर यांचे भागिदार यांना विकून फिर्यादी यांची लाखो रुपयांची फसवणूक केली.
पुढील तपास सहायक पोलीसन निरीक्षक समीर करपे (API Sameer Karpe) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Big financial fraud by creating fake documents ! cheating case registered on Hanif Somji, Sohail Somji, Alnesh Somji and Janice Somji at yerwada police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

 

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या

 

Bigg Boss 15 च्या फिनाले वीकमध्ये पोहचले 7 स्टार, जाणून घ्या कुणाचे पारडे आहे जड?