Pune Crime | दुर्दैवी ! कॉलेजमधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला वाहनाची धडक, दोघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कॉलेजमधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला (Two Wheeler) पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या अवजड वाहनाची (Heavy Vehicle) जोरात धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन दोन विद्यार्थ्यांचा (College Student) दुर्दैवी मृत्यू (Unfortunate Death) झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) कडाचीवाडी हद्दीत घडली आहे. यामध्ये तन्मय पंकज हरगुडे Tanmay Pankaj Hargude (वय-18 रा. साबळेवाडी, ता. खेड) व ओंकार कैलास साबळे Omkar Kailas Sable (वय-18 रा. बहुळ ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहे. या घटनेमुळे साबळेवाडी व बहुळ परिसरात शोककळा पसरली आहे.

हा अपघात चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील (Chakan-Shikrapur State Highway) कडाचीवाडी हद्दीत सायंकाळी तीनच्या सुमारास झाला. तन्मय व ओंकार कॉलेजमधून आपल्या दुचाकीने घरी जात होते. कडाचीवाडी हद्दीत पाठिमागून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात (Accident) दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तन्मयचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. (Pune Crime)

तन्मय याच्या पाठीमागे आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ, चुलते असा परिवार आहे.
बहुळ विविध कार्यकारी विकास सोसायटीचे माजी चेअरमन पंकजबाप्पू हरगुडे यांचे ते चिरंजीव होते.
तर ओकांर हा सामाजिक कार्यकर्ते (Social Worker) कैलास बाजीराव साबळे यांचा मुलगा होता.

 

 

Web Title :- Pune Crime | Bike hit by vehicle the unfortunate death of two students in an accident in chakan shikrapur highway of Pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune) | शिवजयंती निमीत्त नू. म. वी शाळेतील 200 विद्यार्थ्यांना भगवा फेटा घालून आनंद साजरा

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 700 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Corporator Pramod Bhangire | अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला अखेर यश ! हांडेवाडी, काळेपडळ परिसरात 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार