Pune Crime | प्रवासादरम्यान सराफ व्यावसायिकाचे कोट्यावधी रुपयांचे सोने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खासगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या सराफी व्यावसायिकाचे कोट्यावधी रुपयांची बॅग लंपास करणाऱ्या टोळीचा राजगड पोलिसांनी (Rajgad police) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 81 लाखांच्या दागिन्यांची चोरी (Jewelry theft) करणाऱ्या दोघांना (Pune Crime) अटक केली आहे. त्यांच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस (Pune Rural Police) अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

मारूती राजाराम पिटेकर ( रा.माळंगी, ता.कर्जत, जि. नगर,) आनंता लक्ष्मण धांडे ( रा.वालवड, ता.कर्जत, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कमलेश सुकनराज राठोड यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार राजगड पोलीस ठाण्याच्या (Rajgad Police Station) हद्दीत 11 ऑक्टोबर 2021 रोजी घडला होता. तपासादरम्यान आरोपी एकमेकांचे नातलग असून त्यांची 6 जणांची टोळी फिर्यादी कमलेश यांची रेकी करत असल्याचे उघडकीस आले आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हुबळी ते मुंबई (Hubli to Mumbai) असा व्हि.आर.एल. या ट्रॅव्हल्स (KA 25 AA 5943) ने प्रवास करती होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सीट नं. 23,24,25 सीटवर अनोळखी व्यक्ती प्रवास करीत होते. या व्यक्तींनी फिर्यादी यांची रोख रक्कम 18 लाख व 81 लाख 24 हजार रुपये किमतीचे 2110 ग्रॅम वजनाचे 18 कॅरेटचे सोन्याचे वेगवेगळे दागीने असलेली बॅग (Jewelry bag) लंपास केली. आरोपींनी ट्रॅव्हल्स चालकाला मुलाचा अपघात झाला आहे, गाडी इथेच थांबवा असे सांगत मुद्देमालाची बॅग घेऊन पळून गेले.

 

गुन्हा (Pune Crime) दाखल झाल्यावर सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे (API Pramod Pore) आणि त्यांच्या पथकाने हुबळीत जाऊन तपास सुरू केला.तांत्रीक तपासाच्या आधारे पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा कर्जत (नगर) आणि कुर्डूवाडी (सोलापूर) याठिकाणी आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी पथके पाठवून स्थानिक पोलीसांच्या आधारे दोघांना आरोपींना अटक केली. आरोपींकडून 37 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले.

गुन्हा करण्याची पद्धत
आरोपींचा ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. होलसेल सोन्याचे दागिने विकण्याचा व्यवसाय करणाऱ्यांची रेकी करून त्यांना लुटले जात होते.
संबंधीत सोने विक्री व्यापारी ज्या लॉजमध्ये राहत होते, त्या हॉटेलमध्ये आरोपी खोली आरक्षित करीत होते.
त्यानंतर व्यापाऱ्यांचा बसमध्ये पाठलाग करून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरी करीत होते.
चोरी केल्यानंतर चालकाला माझ्या मुलाचा अपघात झाला आहे किंवा माझ्या घरात कोणीतरी मयत झाले आहे. असे सांगून गाडी थांबवून पसार होत होते.

 

अटक करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांवर हल्ला
आरोपी गुन्ह्यात चोरलेल्या मुद्देमाल नातेवाईकांमध्ये वाटत होते.
त्यामुळे पोलीस त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या वस्तीवर गेले असता महिला मोठ्या प्रमाणावर जमत होत्या.
महिला पोलिसांवर दबाव टाकून आरोपींना अटक करण्यास प्रतिबंध करत होत्या.
या महिलांनी पोलिसांवर हल्ले केल्याचे गुन्हे (Pune Crime) कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat police station) दाखल आहेत.

 

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते (Additional Superintendent of Police Milind Mohite),
उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील (Sub-Divisional Police Officer Dhananjay Patil),
पोलीस निरीक्षक सचिन पाटील (Inspector of Police Sachin Patil) याचे मार्गदर्शनाखाली एपीआय प्रमोद पोरे,
एपीआय मनोजकुमार नवसरे, हवालदार खरात, तोडकर, घुले, माने, मदने, जाधव, राजीवडे, लोणकर, मारणे, भोर यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Billions of rupees stolen from goldsmiths during the journey busted by pune rural police (video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | बांधकाम व्यावसायिकांना माहिती अधिकार कायद्याची भीती दाखवत 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अ‍ॅड. राजेश बजाज, बापू शिंदेला गुन्हे शाखेकडून अटक

Life Insurance Fitness Rewards | फिट रहा आणि इन्श्युरन्स प्रीमियमवर सूट मिळवा, जाणून घ्या IRDAI च्या उपक्रमाबाबत

जर तुमचे सुद्धा असेल PNB मध्ये खाते तर होईल 15 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा