Pune Crime | पुण्यात भाजपच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीचे आप्पा जाधव यांच्या कार्यालयावर हल्ला, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महापालिका निवडणुकीचे (Pune Municipal Election 2022) वारे वाहू लागले आहे. अशातच राज्यातील राजकीय वातावरण पेटण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विरोधी पक्ष भाजपमधील (BJP) राजकारण आता मुद्यावरुन गुद्यावर आल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सरचिटणीस आप्पा जाधव (NCP Appa Jadhav) यांच्या कार्यालयावर भाजपच्या 20 ते 25 कर्यकर्त्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आप्पा जाधव यांच्या नारायण पेठेतील (Narayan Peth Pune) कार्यालयात हा हल्ला झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात (Pune Crime) येत आहे.

 

या हल्ल्यामुळे कार्यालयात मोठा राडा झाला. 20 ते 25 जणांनी हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या गोंधळात आप्पा जाधव यांच्या गळ्यातील चैन हिसकावली, असं प्राथमिक दर्शनी दिसतंय. पण आम्ही भाजपच्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या अधिकृत घोषणेची किंवा त्यांच्या प्रेसनोटची वाट पाहतोय, असं शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी स्पष्ट केलं. (Pune Crime)

 

मरहाण करणाऱ्यांमध्ये संतोष कांबळे (Santosh Kamble) हा भाजपचा माथाडी सेनेचा पुणे शहराचा माजी प्रमुख आहे असा आरोप करण्यात आला आहे. तो आता भाजपमध्ये कोणत्याही विद्यमान पदावर नाही. त्यामुळे ही घटना आंबेकरांशी संबंधित आहे की वेगळ्या उद्देशाने, वैयक्तिक वैमनस्यातून आहे का? याबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी जर सांगितले की आरोपींशी भाजपचा सबंध नाही तर आम्हाला पुरेशी राजकीय संस्कृती बिघडू द्यायची नाही. मात्र त्यांनी ही भूमिका स्वीकारली तर राष्ट्रवादी आज रात्रीपासूनच आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा जगताप यांनी दिला.

मारहाणीचा बदला मारहाणीने
दरम्यान, आप्पा जाधव यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर (BJP spokesperson Vinayak Ambekar)
यांनी सोशल मिडियावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दांमध्ये कविता शेअर केली होती.
त्यानंतर आप्पा जाधव यांनी आंबेकर यांना मारहाण (Beating) केली होती. या घटनेचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये केला होता.
त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.
याच घटनेचा बदला घेण्यासाठी आता भाजपकडून आप्पा जाधव यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याची चर्चा सुरु आहे.
पण या घटनेबाबत भाजपकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.

 

Web Title :- Pune Crime | bjp 20 to 25 party workers attack on ncp leader appa jadhav narayan peth office in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाबद्दल जे बोलतात ते जनतेपर्यंत पोहोचवा…’, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आदेश

 

SSY And PPF | सुकन्या समृद्धी आणि PPF वाल्यांसाठी खुशखबर, सरकार घेणार आहे हा मोठा निर्णय!

 

Income Tax Rule | 26 मे पासून इन्कम टॅक्सच्या नियमात होत आहे मोठा बदल, जाणून घ्या अन्यथा येऊ शकता अडचणीत