Pune Crime | ज्ञानवापी मशिदीतील वादात भाजपा महिला प्रवक्त्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) शिवलिंग आहे की पाण्याचे कारंजे यावर वृत्त वाहिनीवरील चर्चेदरम्यान धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरुन नवी दिल्लीतील भाजपा महिला प्रवक्त्यावर कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. (case against BJP’s Nupur Sharma for hurting religious sentiments on TV)

 

याप्रकरणी अब्दुल गफुर अहमद पठाण Abdul Gafur Ahmed Pathan (वय ४७, रा. अशोका म्युज – Ashoka Mews, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४१/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नुपुर शर्मा या भाजपा महिला प्रवक्त्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशिदीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. त्यात पाण्याचे कारंजे असलेल्या ठिकाणी शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका या वृत्त वाहिनीवर ज्ञानवापी मशिदीबाबत चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत नुपुर शर्मा यांनी आमच्या धार्मिक भावना दुखविल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मचाले तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | bjp leader nupur sharma hurting religious sentiments prophet muhammad case against BJP’s Nupur Sharma

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा