Pune Crime | पुण्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार ! गुन्हे शाखेनं आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भरलेल्या गॅस सिलेंडरमधील गॅस चोरी (LPG Gas Theft) करुन काळाबाजार (Black Market In Pune) करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने छापा टाकून अटक (Arrest) केली. तुषार ज्ञानदेव चांदगुडे (Tushar Dnyandev Chandgude) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) आयपीसी 285, जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत (Essential Commodities Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी (Pune Crime) सुनावली आहे.

 

गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार बुधवारी (दि.17) गॅस सिलेंडरमधून (Gas Cylinder) गॅस काढुन काळाबाजार करणाऱ्यांचा शोध घेत होते. त्यावेळी एक इसम दारुवाला पुलाजवळील (Daruwala Bridge) गुरुसिंग गुरुद्वारा पार्कींगमध्ये भरलेल्या गॅस सिलेंडर मधील गॅस रिकामे सिलेंडरमध्ये नळीद्वारे अनधिकृतरित्या भरुन गॅसचा काळाबाजार करत असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने छापा टाकून तुषार चांदगुडे (वय – 27 रा. मु. पो. सुपा, ता. बारामती Baramati) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये 15 सिलेंडर पैकी, भारत गॅस कंपनीचे (Bharat Gas Company) प्रत्येकी 19 लिटरचे 4 सिलेंडर भरलेले व 11 रिकामे सिलेंडर आढळून आले. तसेच गॅस काढण्यासाठी वापरलेले 4 स्टीलच्या नळ्या असा एकूण 37 हजार 500 रुपयांचा माल व 2 लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण 2 लाख 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil), पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे (PSI Rajendra Patole), पोलीस अंमलदार किशोर वग्गु, चेतन गोरे, गजानन सोनूने, मितेश चोरमोले, महिला पोलीस हवालदार साधना ताम्हाणे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Black market of LPG gas cylinders in Pune pune police crime branch arrest one

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा