Pune Crime | पुण्यात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार ! पुणे पोलिसांकडून 6 जणांना अटक, 97 लाखांचा 800 क्विंटल तांदूळ जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील हडपसर (Hadapsar) परिसरामध्ये पुणे गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रेशनिंगच्या दुकानात वाटप केला जाणाऱ्या तांदळाचा (Ration Rice) काळाबाजार (Black Market) करणाऱ्या सहा जणांना अटक (Arrest) करुन 97 लाख 44 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई हडपसर येथील 15 नंबर येथे केली आहे. या कारवाईत (Pune Crime) पोलिसांनी 3 ट्रकसह 800 क्विंटल तांदूळ जप्त केला आहे.

 

मोहंमद इरफान मेहमुदुल हसन अन्सारी (वय-32 रा. मौलवीगंज, जि. धुळे Dhule), इरफान शेरु शेख (वय-28 रा. मज्जिद इसाक नंदी रोड, जि. धुळे), मोहंमद आसिफ अब्दुल लतीफ अन्सारी (वय-30 रा. सौ फुटी रोड, जि. धुळे), शेख जावेद रहिम (वय-44 रा. वल्लभनगर, धुळे), मोहंमद इब्राहिम अब्दुल जब्बार (रा. अकबर चौक, जि. धुळे), मुस्तकीम इस्माईल शहा (वय-23 रा. चांदतारा चौक, मरकत मस्जिद, जि. धुळे ) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालक व क्लिनर यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक स्वारगेट पोलीस स्टेशनच्या (Swargate Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी 15 नंबर हडपसर येथे ट्रक क्रमांक एमएच 18 बी. ए. 7725, एमएच 18 बी.जी. 0053, एमएच 18 बी. जी 5859 या तीन ट्रकमध्ये रेशनिंगचा तांदूळ असून तो छुप्या पद्धतीने खुल्या बाजारात बेकायदेशिररीत्या घेऊन तो रायगड जिल्ह्यातील खोपोली (Khopoli Raigad district) येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी (Pune Police) तीन टीम तयार करुन दोन पंचासमक्ष ट्रक ताब्यात घेतले.

पोलिसांनी ट्रक चालक व क्लिनर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी ट्रकमध्ये तांदूळ असल्याचे सांगितले.
हा तांदूळ श्री कनकलक्ष्मी ॲग्रो ट्रेडर्स (Shree Kanakalakshmi Agro Traders) न्यु अेपीएमसी यार्ड सीबीएस गुंज गंगावटी (New APMC Yard CBS Gunj Gangavati) जिल्हा कोपल राज्य कर्नाटक (Karnataka) या गोडावूनमधून घेतला असल्याचे सांगितले.
तसेच हा तांदूळ रेशनिंगचा असून तो रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील जय आनंद फुड इंडस्ट्रीज (Jai Anand Food Industries) येथे घेऊन जात असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन तिन ट्रक आणि ट्रकमधील 800 क्विंटल तांदूळ जप्त केला.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले (API Vaishali Bhosale),
पोलीस उपनिरीक्षक यशवंत आंब्रे (PSI Yashwant Ambre),
पोलीस अंमलदार किशोर वग्गु, संजय जाधव, मोहसीन शेख, साधना ताम्हाणे, उत्तम तारु, चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने,
निखील जाधव, समिर पटेल, कादीर शेख, मितेश चोरमोले, नवनाथ राख यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Black Marketing of ration rice in Pune Pune police arrested 6 persons and seized 800 quintals of rice worth Rs 97 lakh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा