Pune Crime | महिंद्रा लाइफस्पेस कंपनीकडून ब्लास्टिंग, परिसरातील घरांना तडे; नागरिकांची न्यायालयात धाव

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) मुळशी तालुक्यातील ताथवडे (Tathawade) येथील जीवन नगरमध्ये महिंद्रा लाइफस्पेस कंपनीच्या (Mahindra Lifespace Company) बांधकाम साईटवर (construction site) स्फोटक पदार्थांचे ब्लास्टिंग (Blasting) करण्यात आल्याने परिसरातील अनेक घरांना तडे गेले आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) कंपनीविरुद्ध तक्रार केली. मात्र पोलिसांकडून कोणतीच कारवाई (Action) झाली नसल्याने नागरिकांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात (First Class Magistrate Court) कंपनीविरुद्ध खटला दाखल केल्याची माहिती अ‍ॅड. विजय ठोंबरे (Adv. Vijay Thombre) यांनी दिली आहे. (Pune Crime)

 

चेतन महादेव पवार Chetan Mahadev Pawar (वय-38 रा. जीवन नगर, ताथवडे, ता. मुळशी) यांनी न्यायलायत खटला दाखल केला आहे. ताथवडे परिसरातील महिंद्रा लाइफस्पेस चे बांधकाम करण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. याठिकाणी मंगळवारी (दि.21) स्फोटक पदार्थ वापरुन ब्लास्टिंग करण्यात आले. अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर स्थानिक नागरिकांनी कामाच्या ठिकाणी काम करत असलेल्या गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) आणि राव साहेब (Rao Saheb) यांना ब्लास्टिंगमुळे घरातील सामान पडत असून घराला तडे जात असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी नागरीकांचे न ऐकता काम सुरु ठेवले. (Pune Crime)

कंपनी ब्लास्टिंगचे काम सुरु ठेवल्याने परिसरातील इमारतीत राहणाऱ्या लहान मुले, वृद्ध यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. फिर्यादी यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. परंतु पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी अ‍ॅड. विजय ठोंबरे यांच्या मार्फत न्यायालयात कंपनीविरुद्ध खटला दाखल केला आहे. यामध्ये कंपनीकडून सुरु असलेल्या ब्लास्टिंग मुळे नागरीकांच्या घराला तडे जाऊन जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सबंधित कंपनी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश वाकड पोलिसांना द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Blasting from Mahindra Lifespace Company, smashing houses in wakad area; Citizens run to court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | ‘मोक्का’मधील फरारी अक्षय खवळेला शिवणे परिसरातून अटक; पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

 

Benefits Of Filing ITR | ‘इन्कम टॅक्स’च्या कक्षेत नसाल तरीही दाखल करा ITR, मिळतात अनेक फायदे

 

EPFO मध्ये घरबसल्या अपडेट करा नवीन बँक अकाऊंट; UAN द्वारे होईल काम; जाणून घ्या