Pune Crime | लोणावळ्यात इंजिनिअर तरूणाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील लोणावळा (Lonavala) आणि खंडाळा (Khandala) या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक (Tourist) येत असतात. काही पर्यटक या ठिकणी ट्रेकिंगसाठी (Trekking) येत असतात. मात्र ट्रेकिंग करणे काही जणांच्या जिवावर बेतल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचा (Delhi) एक इंजिनियर तरुण (Young Engineer) लोणावळा येथे फिरण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी आला होता. परंतु अचानक तो बेपत्ता (Missing) झाला. बेपत्ता झालेल्या तरुणाचा 4 दिवसांनी मृतदेह (Dead Body) आढळून आला. फरहान अहमद (Farhan Ahmed) असे या तरुणाचे नाव असून तो 20 मे रोजी बेपत्ता (Pune Crime) झाला होता.

बेपत्ता फरहान याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस (Local Police) आणि रेस्क्यू टीमने (Rescue Team) प्रयत्न केले परंतु तो सापडला नाही. आज (मंगळवार) फरहानचा मृतदेह सापडला आहे. यापूर्वी तरुण बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी एक पत्रक काढत नागरिकांना मुलाला शोधून देण्याचे आवाहन केले होते. शोधून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर (Prize) केले होते.(Pune Crime)

दरम्यान, तरुणाने बेपत्ता होण्यापूर्वी आपल्या भावाला संपर्क करुन ट्रेकिंगच्या जागेची माहिती दिली होती. परंतु त्यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि तो बेपत्ता झाला. आज त्याचा मृतदेह मिळाला आहे. आयएनएसच्या (INS) लोकांना बॉडी लोकेट झाली आहे. एनडीआरएफ (NDRF) सुद्धा घटनास्थळी पोहोचले असून बेपत्ता तरुणाचे शोधकार्य संपल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title : Pune Crime | body of a missing delhi engineer was found in lonavla pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त