Pune Crime | बेपत्ता तरुण बिल्डरचा विहिरीत आढळला मृतदेह, खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप; परिसरात प्रचंड खळबळ
पुणे / शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) शिरुर तालुक्यातील एका बेपत्ता तरुण बांधकाम व्यावसायिकाचा (Young builder) मृतदेह पारनेर तालुक्यातील विहिरीत आढळून (body found in well) आला आहे. मृत बांधकाम व्यावसायिक मागील दोन दिवसांपासून बेपत्ता (Missing) होता. त्याचा आज (बुधवार) मृतदेह आज सकाळी पुणे-नगर रस्त्यावरील (Pune-Nagar road) नारायणगव्हाण (ता. पारनेर) शिवारातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या चेहऱ्यावर आणि शरिरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. आमच्या मुलाचा खून (Murder) करुन त्याला विहिरीत फेकून दिले असून आरोपींना तात्काळ अटक (Pune Crime) करण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. तसेच दोन तास पुणे-नगर रस्ता (Pune-Nagar Road) रोखून धरला.
आदित्य संदीप चोपडा Aditya Sandeep Chopda (वय-24 रा. हुडको वसाहत, शिरुर) असे मृत बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
आदित्यच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य सोमवारी (दि.27) कडूस या त्याच्या मुळ गावी गेला होता.
तेथून परत येत असताना रात्री सातच्या सुमारास त्याने घरी फोन करुन बेलवंटी फाटा (Belvanti Fata) येथे असल्याची माहिती दिली.
त्यानंतर त्याचा संपर्क होऊ शकला नाही. रात्री आठच्या सुमारास त्याला फोन केला असता त्याचा फोन बंद लागला.
त्यामुळे कुटुंबियांनी व हुडको परिसरातील तरुणांनी बेलवंडी फाटा, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण (Narayangavhan) परिसरात त्याचा शोध घेतला.
त्यावेळी नारायणगव्हाण जवळील नवले मळ्याजवळ त्याची दुचाकी रस्त्यालगत सापडली.
पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ
परिसरात चौकशी केली असता, तीन तरुणांशी त्याचे किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर तीन तरुणांनी त्याला गाडीवर बसवून घेऊन गेल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर आदित्यच्या कुटुंबाने तातडीने सुपे पोलीस ठाण्यात (Supe police station) धाव घेत मुलाचे अपहरण (Kidnapping) झाल्याचे सांगितले.
परंतु पोलिसांनी तात्काळ दखल घेण्याऐवजी दुसऱ्या दिवशी येणास सांगून टाळाटाळ केली. मंगळवारी (दि.28) आदित्यचे कुटुंब पोलीस ठाण्यात आले.
दिवसभर थांबवून घेतल्यानंतर संध्याकाळी आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार (Pune Crime) नोंदवून घेतली.
शरीरावर मारहाणीच्या खुणा
दरम्यान, आज (बुधवार) सकाळी 11 च्या सुमारास नवले मळ्यातील विहिरीत आदित्यचा मृतदेह आढळून आला.
सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे (Police Inspector Nitin Kumar Gokave) यांनी पोलीस दलासह घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरिरावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि त्याच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपींचा शोध घेतल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला.
सीआयडी मार्फत चौकशी करा
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी (Suvendra Gandhi) हे घटनास्थळी आले.
त्यांनी हा खूनाचा प्रकार असून याची सीआयडी (CID) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. त्यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईक आणि मित्रांनी पुणे-नगर रस्ता आडवला.
त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलीस उप अधीक्षक अजित पाटील (DYSP Ajit Patil) आणि पोलीस निरीक्षक गोकावे यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
दोषींची गय करणार नाही
जो पर्यंत हल्लेखोर पकडले जात नाहीत तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. याच गोंधळात तब्बल दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प (Traffic jam) झाली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून (local crime branch squad) केला जाईल तसेच या गुन्ह्यातील दोषींची गय केली जाणार नाही, असे आश्वासन पाटील यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी रस्ता रोको मागे घेतला.
व्यवसायातील स्पर्धेतून खून
या घटनेनंतर परिसरात आदित्यचा खून व्यावसायिक स्पर्धेतून (professional competition) झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.
पारनेर तालुक्यातील रस्त्यांची तसेच छोटी-मोठी कामे आदित्य घेत होता. ज्या मळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला त्याच मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम त्याने घेतले होते.
त्यातूनच प्रतिस्पर्ध्यांनी त्याचा खून केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याप्रकरणी सुपे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे सखोल चौकशी पोलीस करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Body of missing young builder found in well, relatives accused of murder; Huge excitement in the area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sharad Pawar | ‘सुप्रियानं’ साकारला शरद पवारांचा पुतळा; खा. सुप्रिया सुळेंकडून ‘कौतुक’